Sandeep Kshirsagar : "वाल्मिक कराड जसा मुंडेंचा खास, तसंच फडणवीस अन्..." अजितदादांच्या 'त्या' वक्तव्यानंतर संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया

Dhananjay Munde Resignation : 'धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्य आहे', असं ट्विट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावल्यानंतर त्यांनी हे ट्विट केलं आहे.
Dhananjay Munde, Walmik Karad, MLA Sandeep Kshirsagar
Dhananjay Munde, Walmik Karad, MLA Sandeep KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 29 Jan : 'अंजली दमानिया यांनी कितीही पुरावे दिले तरी धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) राजीनामा अशक्य आहे', असं ट्विट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावल्यानंतर त्यांनी हे ट्विट केलं आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाची सध्या विविध तपास यंत्रणांकडून चौकशी चालू आहे. मात्र, अद्याप या चौकशीत कोणाच्या सहभागाबाबत ठोस निष्कर्ष समोर आले नाहीत. केवळ कोणी मागणी केली म्हणून लगेच राजीनामा घेतला जाणार नाही. पुरावे असल्याशिवाय कारवाई केली जाणार नाही, असं म्हणत अजितदादांनी मुंडेंच्या राजीनाम्यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

Dhananjay Munde, Walmik Karad, MLA Sandeep Kshirsagar
Mahakumbh Stampede : कुंभमेळ्यासाठी मौनी अमावस्या ठरतेय जीवघेणी? 12 वर्षांपुर्वी चेंगराचेंगरीत 36 बळी, यंदाही तांडव

त्यामुळे आता अजितदादांनी (Ajit Pawar) मुंडेंची पाठराखण केल्याचं पाहायला मिळत आहे. तर अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आता मुंडेंचा राजीनामा अशक्य असल्याचं म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असा आरोप होत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असून मुंडेंच्या पाठिंब्यावरच त्याने बीडमध्ये दहशत पसरवल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळे धनंजय मुडेंचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याच मागणीसाठी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

Dhananjay Munde, Walmik Karad, MLA Sandeep Kshirsagar
Dhananjay Munde: देवाभाऊंची पहिली लिटमस टेस्ट; धनूभाऊ राजीनामा देणार का? दिल्ली हायकमांडच्या निर्णयाकडे लक्ष

शिवाय मुंडेविरोधात आपण अजितदादांना पुरावे दिल्याचंही दमानिया यांनी म्हटलं होत. त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील अजितदादांची भेट घेतली होती. या सर्व घडामोडीनंतर अजित पवार मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, अजितदादांनी आता थेट धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यामुळे संदीप क्षीरसागर यांनी एक्सवर एक पोस्ट करत मुंडेंचा राजीनामा अशक्य आहे.

कारण ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारांचे खास असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "वाल्मिक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे, त्याचप्रमाणे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे खास आहेत. त्यामुळे राजीनामा अशक्य आहे. अंजली दमानिया यांनी कितीही पुरावे दिले तरी राजीनामा अशक्य आहे." तर क्षीरसागर यांच्या पोस्टवर दमानिया यांनी कॉमेंट केली आहे. त्यांनी लिहिलं, "आता अगदी स्पष्ट झाले आहे. यांना मित्राला वाचवायचे आहे. त्या मित्राने जनतेला चिरडले तरी चालेल."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com