Dharashiv Assembly Election: ठाकरेंवरील निष्ठेमुळे नव्हे तर 'या' धमकीमुळे कैलास पाटील सुरतमधून माघारी फिरले, जुन्या सहकाऱ्याचा मोठा दावा

Kailas Patil Loyalty Uddhav Thackeray Kapse Claims: कैलास पाटील हे उध्दव ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांची ही ओळख खोटी असल्याचा दावा आता कापसे यांनी केला आहे. शिवाय ते बंडावेळी मागे का आले याबाबत देखील त्यांनी खळबळजक दावा केला आहे.
Kailas Patil, Uddhav Thackeray
Kailas Patil, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अवघ्या 6 दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच, धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार कैलास पाटील यांच्याबाबत त्यांच्या जुन्या सहकाऱ्याने एक खळबळजन दावा केला आहे.

शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) सुरतला गेलेले, मात्र मधूनच शिंदेंची साथ सोडून मुंबईकडे परतलेले आमदार कैलास पाटील हे उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे परत आल्याचं सांगितलं जातं. मात्र, ते खोटं असल्याचा दावा पाटील यांचे जुने सहकारी आणि कळंब येथील माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांनी केला आहे.

शिवाजी कापसे यांनी नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena) सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सध्या धाराशिव विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे अजित पिंगळे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे कैलास पाटील अशी लढत होणार आहे. काही दिवसांपूर्वी अजित पिंगळे यांनी शिवसेना बंडावेळी कैलास पाटील स्वार्थापोटी ठाकरेंकडे गेल्याचा आरोप केला होता.

Kailas Patil, Uddhav Thackeray
Bhokardan Assembly Election: धक्कादायक : शरद पवार यांच्या उमेदवारावर दगडफेक; मराठवाड्यात नेमंक काय घडलं?

अशातच आता कापसे यांनी केलेल्या खळबळक दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. कैलास पाटील हे उध्दव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. मात्र ही त्यांची ओळख खोटी असल्याचा दावा कापसेंनी केला आहे. शिवाय ते बंडावेळी मागे का आले याबाबत त्यांनी मोठा दावा केला आहे.

कापसेंनी सांगितलं, बंडावेळी ट्रकमध्ये बसून आपण परत आल्याचं कैलास पाटील सांगतात, मात्र ते पूर्णपणे खोटं असून त्यांना मागे येण्यासाठी तानाजी सावंत यांनी गाडी दिली होती. शिवाय खासदार ओमराजे निंबाळकरांना एका शाखा प्रमुखाकडून आमदार परत घेऊन ये म्हणून धक्काबुक्की झाल्यामुळे खासदारांनी पाटील त्यांना सतत फोन केले.

Kailas Patil, Uddhav Thackeray
Nitin Raut Car Accident : काँग्रेसचे नागपूर उत्तरचे उमेदवार नितीन राऊतांच्या कारला ट्रकची धडक

इतकंच नव्हे तर पाटील यांच्या वडिलांनी 'परत ये अन्यथा मी आत्महत्या करेन' अशी धमकी दिल्यामुळे कैलास पाटील माघारी आल्याचा खळबळजनक दावा शिवाजी कापसे यांनी केला आहे. शिवाय ही सर्व माहिती आपल्याला तानाजी सावंत यांनी दिल्याचं देखील कापसे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे कापसेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेला हा दावा धाराशिव मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com