Dharashiv Politics : रक्तात घड्याळ, ह्रदयात भाजप म्हणणाऱ्या मल्हार पाटलांना ओमराजेंचा टोला; 'किडनीत शिंदे गट अन् लिव्हरमध्ये मनसे...'

Lok Sabha Election 2024 : शरीरात हे सगळे पक्ष गेले तर मग पुढे कुठल्याही पक्षात जायला मोकळा होईल.
Dharashiv Politics
Dharashiv PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील याचे पुत्र मल्हार पाटील यांनी मोठे विधान केले होते. आमच्या रक्तात राष्ट्रवादी, रक्तात भाजप आणि हातात धनुष्यबाण आहे, अशी प्रतिक्रिया मल्हार पाटील यांनी दिली होती. यावर प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. धारशिवामधील हा कलगीतुरा चांगलाच चर्चेत आला आहे. (Lok Sabha Election 2024)

मल्हार पाटील यांनी एका प्रचारसभेत असे वक्तव्य केले होते. ते म्हणाले, आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, ह्रदयात भारतीय जनता पार्टी आणि आमच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे. आम्ही महायुतीचं पूर्ण काम, पूर्ण ताकत आणि वर्चस्व आपल्या या धारशिव लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

यावर प्रत्युत्तर देताना अतिशय शेलक्या शब्दात ओमराजे निंबाळकर यांनी मल्हार पाटील यांना टोला लगावला आहे. ओमराजे म्हणाले, "ते म्हणतात आमच्या रक्तात राष्ट्रवादी (NCP) आहे आणि ह्रदयात भाजप आहे. मग आता किडनीत शिंदे गट टाक म्हणलं आणि लिव्हरमध्ये मनसे, म्हणजे शरीरात हे सगळे पक्ष गेले तर मग पुढे कुठल्याही पक्षात जायला मोकळा होईल. काय समर्थन करता? लोकांना गृहीत धरुन राजकारण केलं तर लोकं या गद्दारांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात त्यांनी टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com