Dharashiv politics : ओम राजेंशी घनिष्ठ मैत्री,'ऑपरेशन टायगर पार्ट 2 लिस्टमध्ये नाव, अखेर आमदार कैलास पाटलांचा धाराशिवमध्ये पहिला मोठा धमाका; भाजप, राष्ट्रवादीला हादरा

Dharashiv Politics News : धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात ही महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जात आहे.
dharshiv ubt shivsena
dharshiv ubt shivsena Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धाराशिव जिल्ह्यातील नेते संजय निंबाळकर आणि भाजपचे रामेश्वर शेटे या दोन बड्या नेत्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह हाती मशाल घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी मातोश्रीवर या सगळ्यांनी शिवबंधन बांधून घेतले.

खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर गेल्या काही दिवसापासून धाराशीव जिल्ह्यात आॅपरेशन टायगर टू ची चर्चा सुरू झाली आहे. धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांचे नाव यामध्ये घेतले जात आहे. खासदार ओम राजेनिंबाळकर आणि कैलास घाडगे पाटील यांची घट्ट मैत्री जिल्ह्याच्या राजकारणात कायम चर्चेचा विषय ठरली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी 'ऑपरेशन टायगर टू' चर्चा आणि त्यात आमदार कैलास पाटील यांचे नाव घेत या विषयाला हवा दिली. मात्र कैलास पाटील यांनी ही हवा विरुद्ध दिशेला वळवत संजय निंबाळकर, रामेश्वर शेटे यांच्यासह शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून घेत खळबळ उडवून दिली.

धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात ही महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जात आहे. संजय निंबाळकर तसेच भाजप वकील आघाडीचे जिल्हा संयोजक रामेश्वर शेटे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी आणि शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

रामेश्वर शेटे हे भाजप वकील आघाडीचे जिल्हा संयोजक असून खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष तसेच भाजपच्या विधी विभागात जिल्ह्यात जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला धाराशिवमध्ये धक्का बसल्याची चर्चा आहे. त्यांच्यासोबत धाराशिवचे माजी भाजप शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष राजाभाऊ (अतुल) बागल, उपळा (मा.)चे माजी सरपंच यांचा समावेश आहे.

याशिवाय तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामभाऊ पडवळ, अंबेवाडीचे माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ क्षीरसागर, लासोना येथील माजी सरपंच व तेरणा कारखान्याचे माजी संचालक भिमराव साळुंके, नितळीचे माजी सरपंच बबन सुरवसे, अनसुर्डा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे माजी तालुकाध्यक्ष नानासाहेब जमदाडे, वाडीबामणीचे माजी सरपंच व माजी चेअरमन बाळासाहेब रघुराम नरवडे, वाडीबामणीचे सरपंच कृष्णा तानाजी पवार तसेच जहागीरदारवाडीचे सरपंच शेषेराव राठोड यांच्यासह विविध गावांतील पदाधिकारी व कार्यकर्तेही होते.

dharshiv ubt shivsena
Parbhani News: उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' करत शिंदेंची शिवसेना का गाठली? खासदार संजय जाधवांनी सगळंच सांगून टाकलं

याशिवाय प्रकाश पडवळ, महेश पडवळ, सुरेश गंगावणे, प्रदीप सूर्यवंशी, श्रीहरी माळी, रामा जंगाले, हरीष सुरवसे, नरसिंग जगताप, दौलत गाढवे, गणेश गडकर, विलास वीर, तानाजी भोपे, व्यंकट धाराव, रमेश गादेकर, अनिल बागल, रणजीत वरपे, मारुती शिंपले, किरण खोसे, आश्रुबा गाढवे, रमेश कोळगे आणि गणेश सावळकर यांच्यासह धाराशिव, तुळजापूर व कळंब तालुक्यातील कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश केला.

या पक्षप्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.

dharshiv ubt shivsena
Vidarbha Politics : काँग्रेसचा गड ढासळला! विदर्भातील बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री; 600 कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने राजकीय समीकरण बदलणार!

कोण आहेत संजय निंबाळकर?

निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होते. धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघात त्यांनी पक्षाचे काम केले. 2014 मध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. 2019 मध्ये कळंब-धाराशिवमधून ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते. मात्र, त्यानंतर त्यांनी पक्षाने आपल्याला पुरेशी मदत केली नाही आणि आपला 'बळीचा बकरा' केल्याची नाराजी व्यक्त केली होती.

2024 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले. पक्षाकडून तुळजापूरची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी मतदारसंघातील 192 गावांचा दौराही केला होता. संजय निंबाळकर यांचे धाराशिव जिल्ह्यात सामाजिक व राजकीय पातळीवर काम आहे. त्यामुळे संजय निंबाळकर यांचा ठाकरे गटातील प्रवेश हा आगामी स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com