Dharashiv News : धाराशिवमध्ये मध्यरात्री फिरली सूत्रं! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; नाट्यमय घडामोडीनंतर भाजपची 'फिल्डिंग' उधळत 4 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

Dharashiv Municipal Council news : धाराशिव पालिकेतील चार नगरसेवक मंगळवारी भाजप प्रवेशासाठी मुंबईकडे निघाले होते. मात्र रस्त्यातच नाट्यमय घडामोडी घडल्या.
dharashiv shivsena
dharashiv shivsena Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Dharshiv News : धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकारण ३६० डिग्रीमध्ये बदलले आहे. गेल्या आठवड्यात कळंब नगरपालिकेतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या १० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर धाराशिव पालिकेतील चार नगरसेवक मंगळवारी भाजप प्रवेशासाठी मुंबईकडे निघाले होते. मात्र रस्त्यातच नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर या चार नगरसेवकांनी बुधवारी ठाण्यात जाऊन पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश केला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील नेतेमंडळी उपस्थित होते.

धाराशिव नगर परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी 4 नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश केला. नगरसेवक प्रदीप मुंडे, नाना घाडगे, सोनाली अमित उंबरे व करवर यांनी प्रवेश केला. यावेळी सहसंपर्कप्रमुख सुरज महाराज साळुंके, ऋषी मगर, सोमनाथ गुरव यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.

धाराशिव पालिकेतील चार नगरसेवक मंगळवारी भाजप प्रवेशासाठी मुंबईकडे निघाले होते. मात्र रस्त्यातच इंदापूरनजीक त्यांच्यामध्ये प्रवेशावरून वाद झाला. त्यामुळे मुंबईला जाण्याऐवजी ही मंडळी धाराशिवकडे परत निघाली होती. त्यानंतर नाट्यमय घडामोड घडली. या चार नगरसेवकांनी बुधवारी ठाण्यात जाऊन शिवसेनेत प्रवेश केला.

dharashiv shivsena
Dharashiv Politics : ओम राजेनिंबाळकरांशी घनिष्ठ मैत्री; ऑपरेशन टायगर पार्ट 2 मध्ये नाव... सगळं बाजूला ठेवून आमदार कैलास पाटलांचा धाराशिवमध्ये पहिला मोठा धमाका

धाराशिव नगरपालिकेतील ठाकरे सेनेचे 4 नगर सेवक शिंदे यांचा शिवसेनेत गेल्याने आता येथील समीकरण बदलणार आहे. याठिकाणी भाजपकडूनऑपरेशन लोटस राबविले जात असतानाच अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यामध्ये धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांची भूमिका निर्णायक ठरली. त्यांच्या मनधरणीनंतर याठिकाणी अखेर ऑपरेशन 'टायगर' यशस्वी झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Om rajeNimbalkar
dharashiv visit
Omraje Nimbalkar
Dharashiv BJP, Shivsena Leader
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com