
Solapur News: लोककलेच्या नावाखाली धाराशिव व सोलापूर जिल्ह्यात कला केंद्राचे पेव फुटले आहे. लोककलेच्या नावाखाली कुणतेही बेकायदा प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. बेकायदा कला केंद्रावर कारवाई करा, असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी शासकीय विश्रामगृहात पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. सासुरे (ता. बार्शी) येथे कला केंद्रातील नर्तकीसाठी बीड जिल्ह्यातील माजी उपरसरपंचांनी आत्महत्या केल्याने हा प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आला.
यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले की, लोककलेच्या नावावर शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना लुबाडता येणार नाही. कोणतेही बेकायदा प्रकार प्रशासनाने खपवून घेऊ नयेत. लावणी ही महराष्ट्राची संस्कृती आहे. आपली लोककला आहे. लावणीबद्दल सर्वांना आदर आहे. मात्र, लोककलेच्या नावाखाली कोणीही गैरप्रकार करत असेल तर ते खपवून घेऊ नका, असे स्पष्ट आदेश आपण धाराशिव जिल्ह्यात दिले आहेत, येथील अधिकाऱ्यांनीही कला केंद्रावर कारवाई करावी, असा आदेश मंत्री सरनाईक यांनी दिला.
काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्र गोळीबार प्रकरण समोर आले होते. अशातच धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रासमोर झालेल्या मारहाणीत गोळीबार झाला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असतानाही गोळीबाराचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
पुण्याच्या दौंड तालुक्यातील वाखरी येथील न्यू अंबिका या कलाकेंद्रातील गोळीबाराची घटना ताजी असतानाच बीडच्या गेवराई तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने नर्तिकेच्या प्रेमाच्या नादात आत्महत्या केल्याचा एक धक्कादायक प्रकार घडल्याची धक्कादायक बाब समोर आली. यानंतर आता सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा तालुक्यात कलाकेंद्रात झालेल्या गोळीबारानं मोठी खळबळ उडाली होती.
माढ्याच्या वेणेगाव येथे जय मल्हार कलाकेद्रांच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली होती. कलाकेंद्रात एकच बैठक लावण्याच्या कारणावरुन हा खटके उडाल्यानंतर त्याचे रुपांतर टोकाच्या भांडणात झाले. या भांडणात आरोपीनं एका तरुणावर थेट पिस्टलमधून गोळीबार करण्यात आला होता.
माजी उपसरपंचाची डोक्यात गोळी मारून आत्महत्या
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यांनी बंदुकीतून गोळी झाडून स्वत:ला संपवले होते.
यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत कला केंद्रातील 21 वर्षीय नर्तकी पूजा गायकवाडला अटक केली. ज्यात या नर्तिकेशी उपसरपंच गोविंद बर्गे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती समोर आली होती. गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.