Dharashiv ZP power struggle: धाराशिव 'झेडपी'त सर्वात मोठा ट्विस्ट, दोन सदस्य फुटले; भाजपचा एकाचवेळी ज्ञानराज चौगुलेसह ठाकरेंच्या शिवसेनेलाही 440 चा झटका

Dharashiv Zilla Parishad News : सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला 28 हा मॅजिक फिगर कोण गाठणार याची उत्सुकता शिगेला पोहचली असताना आता भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मोठा डाव टाकला आहे.
tanaji sawant, dyanraj choghule, rana patil, kailas patil, om rajenimbalkar
tanaji sawant, dyanraj choghule, rana patil, kailas patil, om rajenimbalkar Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Politics : धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठ दिवस झाले आहेत. त्यामुळे आता राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला 28 हा मॅजिक फिगर कोण गाठणार याची उत्सुकता शिगेला पोहचली असताना आता भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मोठा डाव टाकला आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला. परंडा व उमरगा तालुक्यातील दोन अपक्ष जिल्हा परिषद सदस्यांना त्यांनी गळाला लावले. त्यामुळे आता धाराशिव झेडपीतील राजकीय समीकरण 360 डिग्रीने बदलले आहे.

धाराशिव जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसापासून भाजपला सत्तास्थापन करण्यापासून दूर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shivsena) व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत हालचाली सुरु होत्या. त्यामुळे सर्वच पक्षाने जिल्हा परिषद सदस्यांना सहलीवर पाठवले आहे. दुसरीकडे भाजपने शिंदे सेनेतील तानाजी सावंत गट बाजूला ठेवून सत्तास्थापन करण्यासाठी डाव टाकला आहे. त्यामध्ये शिंदे सेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा गट हा भाजपसोबत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

त्यामुळे आता महायुतीबाबतचा निर्णय मुंबई दरबारी सीएम फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. त्यातच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला दिला असल्याची चर्चा रंगली असतानाच सोमवारी मोठी घडामोड घडली असून भाजपने डाव टाकल्याने आता काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

tanaji sawant, dyanraj choghule, rana patil, kailas patil, om rajenimbalkar
BJP Congress Controversy 2026 : राजकारणात खालची पातळी? ‘जीभ छाटा, 10 लाख देतो’; भाजप शहराध्यक्षांच्या घोषणेनं खळबळ

माजी आमदार ज्ञानराज चौगुले समर्थक शिवसेनेचे बंडखोर उमेदवार उमरगा तालुक्यातील आलूर गटाचे आप्पासाहेब मल्लिनाथ पाटील व परंडा तालुक्यातील लोणी गटातून निवडून आलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट समर्थक अपक्ष उमेदवार राणी रेवणाथ ढोरे तसेच हे दोघेही आता भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या गटात दाखल झाले आहेत. या घडामोडीमुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटात अस्वस्थता पसरली आहे.

tanaji sawant, dyanraj choghule, rana patil, kailas patil, om rajenimbalkar
Shivsena UBT : 'मुंबईतील रस्त्यांना 'टिपू'चे नाव द्यायचा प्रस्ताव भाजपचाच; महापौर रितू तावडे साक्षीदार, आपल्या फायद्यासाठी त्याची कबर...' ठाकरेंचा घणाघात

कोकणातील मुक्काम कर्नाटकात हलवला

सध्या सहलीवर गेलेल्या भाजप समर्थक उमेदवारांचा कोकणातील मुक्काम कर्नाटकात हलविण्यात आल्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमधून राजकीय हालचालींना वेग आल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यासोबतच हे दोन सदस्य त्यांच्या गोटात सहभंगी झाल्याची महिती आमदार राणा पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांना दिली आहे.

tanaji sawant, dyanraj choghule, rana patil, kailas patil, om rajenimbalkar
NCP President: राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडीचा दिवस ठरला! विलिनिकरणाच्या चर्चांबाबतही महत्वाची घडामोड समोर

उलथापालथी होण्याची शक्यता

धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा संघर्ष अधिकच तीव्र होत असून येत्या काही तासांत आणखी उलथापालथी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वच राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग देण्यात आला असून धाराशिव जिल्ह्याचे राजकारण सध्या अत्यंत चुरशीच्या टप्प्यावर पोहोचले आहे. सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

tanaji sawant, dyanraj choghule, rana patil, kailas patil, om rajenimbalkar
BJP Congress Controversy 2026 : राजकारणात खालची पातळी? ‘जीभ छाटा, 10 लाख देतो’; भाजप शहराध्यक्षांच्या घोषणेनं खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com