Dharashiv Zp President : सस्पेन्स संपला! धाराशिवमध्ये झेडपीचे अध्यक्षपद अर्चना पाटलांकडेच; शिवसेनेकडून उपाध्यक्षपदी माजी खासदाराच्या पत्नीला संधी

Zilla Parishad politics News : धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी दुपारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
Archana patil, Usha Gaikwad
Archana patil, Usha Gaikwad Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी दुपारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीमधील वाद संपुष्टात आल्याने निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीने उमेदवार दिल्याने मतदानाची प्रक्रिया पडणार पार पडणार आहे. पण महायुतीमधील मतदान 44 च्या जवळ गेल्याने महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या अर्चना पाटील तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या उषा गायकवाड यांची वर्णी लागणार आहे.

गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या महायुतीमधील वादावर अखेर शेवटच्या दिवशी तोडगा निघाला आहे. त्यानुसार अध्यक्षपद भाजपच्या वाट्याला गेले आहे तर उपाध्यक्षपद एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला आले आहे. तर सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना संधी दिली जाणार आहे. या वादावर पडदा पडताच शुक्रवारी सकाळी ११ वाजता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. यावेळी महायुतीच्या वतीने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत उमेदवारी अर्ज दाखल केले.

Archana patil, Usha Gaikwad
BJP Deputy Sabhapati : उपसभापतिपदी निवड होताच भाजप नेत्याची जातीच्या दाखल्याची सुनावणी ठरली; सोलापूर, उमारग्यात तक्रार

महायुतीकडून अध्यक्षपदासाठी तेर जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या सदस्या अर्चना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या कदेर गटातील विजयी उमेदवार उषा गायकवाड यांनी अर्ज दाखल केला. महायुतीतील समन्वयातून या दोन्ही उमेदवारांची निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Archana patil, Usha Gaikwad
Shivsena Case: "पुन्हा आशा पल्लवित झाल्या"; शिवसेनेच्या आजच्या सुनावणीबाबत असीम सरोदेंनी दिली अत्यंत महत्वाची माहिती

महाविकास आघाडीकडून शिवसेना (उबाठा) पक्षाकडून अध्यक्ष पदासाठी शिराढोण जिल्हा परिषद गटातील कांचनमाला संगवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी कवठा जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सरळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे.

Archana patil, Usha Gaikwad
NCP Politics : पुणे महापालिकेत राष्ट्रवादीचे धक्कातंत्र, स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर, 'या' नेत्यांना मिळाली संधी

धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपचे 19, एकनाथ शिंदे शिवसेनेचे 15, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 6, अपक्ष व इतर पक्षाचे 4 असे एकूण 44 चा आकडा जुळला असल्याचे सांगितले आहे. तर विरोधात उद्धव ठाकरे सेना 7, काँग्रेस 3, बंडखोर 1 असे एकूण 11 महाविकास आघाडीचे संख्याबळ आहे. त्यामुळे आता शुक्रवारी दुपारी मतदानानंतर अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Archana patil, Usha Gaikwad
Congress News : काँग्रेसमध्ये बड्या नेत्यांच्या भेटीगाठी : प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना सुरुवात; इच्छुकांच्या दिल्ली दौऱ्यांनी वाढवलं तापमान

शुक्रवारी दुपारी 2 वाजता सर्व सदस्य जिल्हा परिषदेत विशेष सभेसाठी एकत्र येणार आहेत. दुपारी 2.30 वाजता अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. मतदानानंतर लगेच अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Archana patil, Usha Gaikwad
BJP Deputy Sabhapati : उपसभापतिपदी निवड होताच भाजप नेत्याची जातीच्या दाखल्याची सुनावणी ठरली; सोलापूर, उमारग्यात तक्रार

शिंदे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती

महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, युवा नेते मल्हार पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, उमरगा येथील नगराध्यक्ष किरण गायकवाड तसेच अपक्ष उमेदवार धनंजय सावंत आदी उपस्थित होते. मात्र, यावेळी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे .

Archana patil, Usha Gaikwad
NCP News : पुणे जिल्हा ताब्यात घेण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपचा फक्त एक सभापती : 10 पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच ‘दादा’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com