Dharashiv Politics : धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत वादाचा भडका; पालकमंत्री सरनाईक, राजन साळवींसह प्रभारी जिल्हाप्रमुखांवर गंभीर आरोप

Ajit Khot press conference News : धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु असतानाच आता त्यामध्ये मोठा ट्विस्ट आला आहे.
Pratap Sarnaik, tanaji sawant
Pratap Sarnaik, tanaji sawant Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु असतानाच आता त्यामध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन गट आक्रमक झाले असून एकमेकांवर करण्यात येत असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे धाराशिव जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः भाजपसोबत जाण्यावरूनच एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यातच शनिवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते अजित खोत यांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक गंभीर आरोप केले.

धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Saranik), धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख राजन साळवी व प्रभारी जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना अजित पिंगळे यांनी भाजपच्या दावनीला बांधली असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते अजित खोत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

Pratap Sarnaik, tanaji sawant
Shiv Sena vs BJP : माघार की कुरघोडी! संभाजीनगर झेडपीत मोठा ट्विस्ट; अध्यक्षपदावरून भाजप-शिवसेनेत खटके उडणार

यावेळी पत्रकार परिषदेत अजित खोत यांनी अनेक गंभीर आरोप शिवसेनेच्या नेते मंडळींवर केले आहेत. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे तिकीट वाटप करीत असताना शिवसेना (Shivsena) नेते अजित पिंगळे यांनी मोठा गैरप्रकार केला असून त्यांनी भाजप नेत्याच्या हातात कोरे एबी फॉर्म दिले असल्याचा आरोप केला आहे. त्याशिवाय निवडून आलेले शिवसेनेचे दोन सदस्य गायब झाले आहेत. या गायब झालेल्या दोन शिवसेना सदस्याला कोण उमेदवारी दिली याची कुंडलीच त्यांनी पत्रकार परिषदेत काढली.

Pratap Sarnaik, tanaji sawant
BJP Vs Mahadeo Jankar : महादेव जानकरांचा एकमेव आमदार मनाने भाजपमध्ये : ZP मध्ये स्वतःचे उमेदवार देऊन फुलवलं कमळ, पंचायत समितीवरही झेंडा

भर पत्रकार परिषदेतच अजित खोत यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक, धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख राजन साळवी व प्रभारी जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेची पीछेहाट झाली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. धाराशिव नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पदाची जागा कोणी भाजपला सोडली हे स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली.

Pratap Sarnaik, tanaji sawant
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी अजितदादांच्या पक्षातील आमदार उघडपणे पुढे आला; पटेल, तटकरेंना विनंती करणार

अजित खोत यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिंदे शिवसेनेतील दोन गट या निमित्ताने एकमेकांवर टीका करीत आहेत. त्यातच आता खोत यांनी केलेल्या टीकेनंतर आता दुसऱ्या गटाकडून याला प्रत्युतर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे या शिवसेनेतील अंतर्गत वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरीत आहे.

Pratap Sarnaik, tanaji sawant
Congress Vs BJP : 'अशोक चव्हाण खुर्चीत, नगराध्यक्ष उभे...'; काँग्रेस प्रवक्त्याने 'चव्हाण', 'देशमुख' पॅटर्नमधील फरक सांगितला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com