Ratnakar Gutte, Mahadev Jankar
Ratnakar Gutte, Mahadev JankarSarkarnama

BJP Vs Mahadeo Jankar : महादेव जानकरांचा एकमेव आमदार मनाने भाजपमध्ये : ZP मध्ये स्वतःचे उमेदवार देऊन फुलवलं कमळ, पंचायत समितीवरही झेंडा

RSP Mahadev Jankar VS Ratnakar Gutte : जिल्हा परिषद निवडणुकीत महादेव जानकर यांचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी भाजपशी जवळीकर साधत भाजपच्या तिकीटावर आपले समर्थक निवडून आणले आहेत.
Published on

BJP News : गंगाखेडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे हे सध्या मनाने पूर्णपणे भाजपमय झाले आहेत. त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश झाला नसला तरी त्यांची तयारी मात्र त्यांनी सुरू केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी परभणी जिल्ह्यात भाजपसाठी घेतलेले कष्ट यावरून ते केवळ नावालाच राष्ट्रीय समाज पक्षात असल्याचे दिसून आले आहे. यावरूनच ज्या पक्षाकडून ते आमदार आहेत, त्या पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर पुढच्या विधानसभेत रत्नाकर गुट्टे दिसणार नाही, अशी व्यवस्था करतो असा इशारा दिला होता.

रत्नाकर गुट्टे यांनीही भाजपमध्ये स्वतःचे स्थान अधिक बळकट केले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत गुट्टे यांनी भाजपशी जुळवून घेतले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि गुट्टे यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार भाजपच्या कमळ चिन्हावर गुट्टेचे अनेक समर्थक निवडून आले आहेत. भाजपने आपल्या पक्षाचे बी फाॅर्मच गुट्टे यांच्या हवाली केले होते. रत्नाकर गुट्टेंनी जिल्हा परिषदमध्ये आपली ताकद दाखवून दिली.

पाठोपाठ पूर्णा पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेसाठी गुट्टे यांनी यशवंत सेनेच्या आपल्या 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका सदस्याला भाजपमध्ये प्रवेश देत बहुमत मिळवून दिले. त्यामुळे पंचायत समितीच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महादेव जानकर यांनी महायुतीची साथ सोडली असली तरी रत्नाकर गुट्टे भाजपशी जुळवून आहेत. मात्र त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश 2029 मधील विधानसभा निवडणुकीवेळीच होण्याची शक्यता आहे.

Ratnakar Gutte, Mahadev Jankar
Nashik Mayor: फक्त कुंभ नाही, नाशिकचा गेमचेंजर! हिमगौरी आडके यांचा मास्टरप्लॅन; ‘थिंक टॅंक सिटी’ची घोषणा

स्थानिक निवडणुकीत भाजपचे काम :

नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत भाजपच्या यशात गुट्टे यांचा महत्त्वाचा रोल राहिला आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी वरिष्ठांच्या सूचनेनूसार पक्षाचे बी फाॅर्म गुट्टे यांच्याकडे दिले आणि त्यावर गुट्टे सांगतील त्या पदाधिकारी, समर्थकांना उमेदवारी देण्यात आली होती. अर्थात त्यांना निवडून आणण्याची जबाबदारीही गुट्टे यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती.

भाजपची ही रणनीती कमालीची यशस्वी ठरली आणि जिल्हा परिषदेत हा पक्ष सर्वाधिक जागा जिकंत नंबर एकचा ठरला. आता सत्ता स्थापनेतही गुट्टे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे रत्नाकर गुट्टे हे पुर्णपणे भाजपमय झाले आहेत. सध्या तांत्रिक अडचणीमुळे ते रासपमध्ये आहेत. कोणत्याही क्षणी ते अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघ आणि परभणी जिल्ह्यात रत्नाकर गुट्टे हे एक मोठे प्रस्थ, मुरब्बी राजकारणी आणि साखर कारखानदार म्हणून ओळखले जातात. 2019 मध्ये रासपकडून तुरुंगात असतांना विधानसभेची निवडणूक जिंकल्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 2024 मध्येही ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. पण सध्या त्यांनी स्थानिक पातळीचे राजकारण लक्षात घेता भाजपला मदतीचे धोरण स्वीकारले आहे.

जानकरांनी विडा उचलला...

दुसरीकडे महादेव जानकर यांनी राज्यातील भाजप-महायुतीच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. भाजपच्या नेत्यांनी आपला विश्वास घात केला म्हणत जानकर आता काँग्रेस आघाडीसोबत गेले आहेत. परभणी जिल्ह्यातही त्यांनी जिल्हा परिषदेला उमेदवार दिले होते. त्यांच्या प्रचारासाठी मोटारसायकलवर गावागावत जानकर फिरले. याच दरम्यान केलेल्या भाषणात त्यांनी रत्नाकर गुट्टे यांचाही समाचार घेतला.

Ratnakar Gutte, Mahadev Jankar
NCP Leadership : ‘विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व अजितदादांकडे देण्याचा निर्णय पवारांसह सर्व नेत्यांनी घेतला होता’

गुट्टेंची वाटचाल भाजपकडे

जानकर म्हणाले, मी महायुतीची साथ सोडली पण माझाच आमदार त्यांच्यासोबत आहे. पण कधी कधी माणसं घेताना चूक होते, पण तुम्ही मला लोकसभेला साथ दिली, तशी जिल्हा परिषदेला द्या. पुढच्या विधानसभेत रत्नाकर गुट्टे आमदार म्हणून दिसणार नाहीत, याची व्यवस्था मी करतो, असा इशाराच जानकरांनी दिला होता. एकूणच जानकर-गुट्टे यांच्यात फाटले हे आता स्पष्ट झाले आहे. गुट्टे यांची प्रो भाजप भूमिका त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीचे संकेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com