Shiv Sena vs BJP : माघार की कुरघोडी! संभाजीनगर झेडपीत मोठा ट्विस्ट; अध्यक्षपदावरून भाजप-शिवसेनेत खटके उडणार

ZP Election Chhatrapati Sambhajinagar : दोन्ही पक्षाच्या सदस्यांमधील फरक हा फार मोठा नसल्यामुळे अध्यक्षपदासाठी शिवसेना - भाजप दोघांकडून दावा केला जात आहे.
ZP Election Chhatrapati Sambhajinagar
ZP Election Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Shivsena BJP News: छत्रपती संभाजीनगर महापालिकेनंतर जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना-भाजप युतीने मोठे यश मिळवले. महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वबळावरच लढले. अर्थात झेडपीसाठी शिवसेना - भाजप या दोन पक्षांची कागदावर मात्र युती झाली होती. नंतर बहुतांश गटात आणि गणात दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना बी फॉर्म देत मैदानात उतरवले होते. तरीही दोन्ही पक्षांना चांगले यश मिळाले आणि 23 जागा जिंकत भाजप पुन्हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्या खालोखाल शिवसेनेलाही 21 जागांवर यश मिळाले.

दोन्ही पक्षाच्या सदस्यांमधील फरक हा फार मोठा नसल्यामुळे अध्यक्षपदासाठी शिवसेना - भाजप दोघांकडून दावा केला जात आहे. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने आत्ताच्या इतक्यात जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला होता. पण त्यावेळीही शिवसेनेने काँग्रेस सोबत हातमिळवणी करत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले होते.

याचा वाचपा कुठेतरी भाजप यावेळी काढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. महानगरपालिकेत शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज नसताना राज्यातील युतीचा धर्म पाळत भाजपने शिवसेनेला सोबत घेत त्यांना उपमहापौर पदही दिले. महापालिकेत दाखवलेला मनाचा मोठेपणा जिल्हा परिषदेत आता शिवसेनेने दाखवावा, अशी अपेक्षा भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

मात्र महापालिकेत फक्त 13 नगरसेवक निवडून आल्यामुळे बॅक फुटवर गेलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेला जिल्हा परिषदेत 21 सदस्यांसह फ्रंट सीटवर जाण्याची संधी सोडायची नाही. परंतु त्यासाठी आधी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना पक्षातील अंतर्गत गटबाजी, मतभेद आणि हेवेदावे बाजूला सारावे लागतील. तर दुसरीकडे महापालिकेत युतीधर्म पाळणाऱ्या भाजपच्या नेत्यांना जिल्हा परिषदेत अध्यक्ष पदासाठी शिवसेनेने नमते घ्यावे अशी अपेक्षा आहे.

ZP Election Chhatrapati Sambhajinagar
Narhari Zirwal : आता झिरवाळांच्याच मागे विरोधकांचा सापळा, राजीनाम्याची मागणी करत पडले तुटून

त्यामुळे अध्यक्षपदावरून शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा वादावादी किंवा संघर्षाचा प्रसंग उद्भवू शकतो. त्यामुळे आतापासूनच छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील अध्यक्षपद आणि सत्तेतील वाटपा संदर्भात राज्याच्या नेत्यांना हस्तक्षेप करावा लागणार असे चित्र आहे. जिल्हा परिषदेत भाजपचे 23 तर शिवसेनेचे 21 सदस्य निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच तर काँग्रेस आणि प्रहार संघटनेचा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला आहे. तर तीन ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली आहे.

भाजपाला रोखण्यासाठी तिसरी आघाडी ?

हे संख्याबळ पाहता अध्यक्षपदासाठी वेगळा प्रयोगही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून भाजपला रोखण्यासाठी दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची कुजबुजही राजकीय वर्तुळात सुरू आहे. अध्यक्षपदासाठी आवश्यक असणारी मॅजिक फिगर हे तीन पक्ष एकत्र आल्यास गाठू शकतात अशी परिस्थिती आहे. परंतु अडीच - अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाले तर शिवसेना आणि भाजप हे राज्यातील युतीत असलेले दोन पक्ष पाच वर्ष जिल्हा परिषदेत सत्ता कायम राखू शकतात.

अडीच वर्षांचा फाॅर्म्युला

भाजप जिल्हा परिषदेतही सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे पहिली अडीच वर्षे अध्यक्ष पदासह महत्त्वाची सभापती पदे आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न करणार आहे. तर शिवसेनेला उपाध्यक्ष पद देण्याची तयारी स्थानिक नेते दाखवू शकतात. अर्थात हा फॉर्मुला शिवसेनेला मान्य व्हायला हवा. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण असल्याने भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्पर्धाही वाढणार आहे.

माघार कोण घेणार?

सध्या तरी जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना-भाजप हे युतीतील दोन पक्षच एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील असा अंदाज आहे. सत्तेची संधी दवडणार नाही. तडजोड आणि एक पाऊल मागे येण्याची तयारी दर्शवत जिल्हा परिषदेचा कारभार पाच वर्षे आपल्याच हाती ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाचे नेते करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिंदे यांची शिवसेना किंवा भाजप एकमेकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिसऱ्या पर्यायाचा विचार करेल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही.

ZP Election Chhatrapati Sambhajinagar
Vaishnavi Hagawane case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; मुख्य आरोपी कोण? 6 जणांवर आरोप निश्चित; आता कोर्ट...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com