MLA Ramesh Bornare News : उद्धव ठाकरेंची टीका जिव्हारी, आमदार बोरनारेंचाही पलटवार

MLA Ramesh Bornare directly accused Uddhav Thackeray : मला उलटे टांगण्याची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनाच हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर हिंदुत्वाला तिलांजली देऊन काँग्रेस सोबत सत्तेत गेलेल्या उद्धव ठाकरे यांना उलटे टांगले असते, अशा शब्दात बोरनारे यांनी ठाकरे गटावर हल्ला चढावला.
Uddhav Thackeray-MLA Ramesh Bornare
Uddhav Thackeray-MLA Ramesh BornareSarkarnama
Published on
Updated on

Vaijapur Assembly Constituency News : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अडचणीत सापडला आहे. दोन वर्षांपूर्वी पक्षात प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. तर ज्यांच्यासाठी पायघड्या घातल्या ते भाजपचे दिनेश परदेशी उद्धव ठाकरे वैजापूर येऊनही पक्षात आले नाही. त्यामुळे खिंडीत सापडलेल्या उद्धव ठाकरे यांनी वैजापुरातील मेळाव्यातून विद्यमान शिवसेना आमदार बोरनारे यांच्यावर आगपाखड केली.

मात्र त्यांच्या टीकेला बोरनारे (Ramesh Bornare) यांनीही जशास तसे उत्तर देत पलटवार केला. मला उलटे टांगण्याची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर ते काँग्रेस सोबत गेल्याबद्दल उलटे लटकवले असते, असा घणाघात बोरनारे यांनी केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पैसे घेऊन आपल्याला उमेदवारी देणार होते, असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर करत आमदार बोरनारे यांनी खळबळ उडवून दिली.

15 सप्टेंबर रोजी वैजापूर मध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात ठाकरेंनी गद्दारी करणाऱ्या आमदार रमेश बोरनारे यांचा आपल्या भाषणातून समाचार घेतला होता. येणाऱ्या निवडणुकीत बोरनारे यांना पराभूत करून उलटे टांगा, अशी भाषा उद्धव ठाकरे यांनी वापरली होती. यावर मतदार संघातील एक कार्यक्रमात आमदार बोरनारे यांनी संताप व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्यावर पैसे देऊन उमेदवारी देणार होते, असा गंभीर आरोप केला.

Uddhav Thackeray-MLA Ramesh Bornare
MLA Ramesh Bornare : शिवसेनाविरुद्ध शिवसेना 'सामना'; वैजापूरमध्ये राजकीय उलथापालथींना वेग

मला उलटे टांगण्याची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर हिंदुत्वाला तिलांजली देऊन काँग्रेस सोबत सत्तेत गेलेल्या उद्धव ठाकरे यांना उलटे टांगले असते, अशा शब्दात बोरनारे यांनी ठाकरे गटावर हल्ला चढावला. विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर आली आहे. वैजापूर मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच दुसऱ्यांदा आमदारकी मिळवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे प्रा.रमेश बोरनारे सक्रिय झाले आहेत.

शिवसेना पक्ष सोडल्यानंतर जिल्ह्यातील स्थानिक नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर बोरनारे यांनी गंभीर आरोप केले होते. मात्र आपल्यावर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी हे आरोप केले होते. स्वतःहून बोरनारे आतापर्यंत शिवसेनेबद्दल किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी काहीही बोलले नव्हते. विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तशी आक्रमक भूमिका दोन्ही बाजूंनी घेतली जात आहे. रमेश बोरनारे यांना पराभूत करून गद्दारीचा वाचपा काढण्यासाठी आसुसलेल्या ठाकरे गटाच्या नेत्यांना नुकताच धक्का बसला तो माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यामुळे.

Uddhav Thackeray-MLA Ramesh Bornare
Uddhav Thackeray : मोदींनंतर ठाकरेंच्या डोक्यावर 'गांधी टोपी', महिला नेत्याने एका शब्दात विषय संपवला

शिवाय ज्या दिनेश परदेशी यांना पक्षात घेऊन विधानसभेची उमेदवारी देण्याच्या हालचाली ठाकरे गटाच्या तालुक्यातील काही नेतेमंडळीकडून सुरू होत्या ते परदेशी ऐनवेळी पलटले. पक्षात प्रवेश करण्यास नकार दिला त्यामुळे शिवसेनेची वैजापूर मतदारसंघात कोंडी झाली. अशावेळी शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेत थेट उद्धव ठाकरे यांनाच अंगावर घेतले. आमदार रमेश बोरनारे हे शांत आणि संयमी स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. पंधरा वर्षाहून अधिक काळ वैजापूरचे तालुकाप्रमुख म्हणून त्यांनी काम केले.

दिवंगत माजी आमदार आर. एम. वाणी यांचे शिष्य म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या शिफारशीवरूनच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी बोरनारे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या प्रचार सभेत बोलताना तुम्ही मला आमदार निवडून द्या, या मतदारसंघाला काहीही कमी पडू देणार नाही, असा शब्द त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला होता. मात्र पहिल्याच निवडणुकीत विजयी झालेल्या आमदार बोरनारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ देत वेगळी भूमिका घेतली.

Uddhav Thackeray-MLA Ramesh Bornare
Shivsena Leader Ambadas Danve News : मराठवाड्यात शेहचाळीस रुपयांचे काम दाखवा, एक लाखाचे बक्षीस घ्या..

त्यानंतर गद्दारीचा शिक्का त्यांच्या माथ्यावर बसला. हा शिक्का पुसण्याचे आणि दुसऱ्यांदा निवडून येण्याचे मोठे आव्हान बोरनारे यांच्यासमोर असणार आहे. ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजी आणि निवडणुकीच्या तोंडावर चुकलेले निर्णय बोरनारे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवाय ठाकरे गटाविरुद्ध आक्रमक व्हा, असा संदेश राज्यातील सगळ्याच आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर बोरनारे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांना उलटे टाकण्याची भाषा केल्याने येणाऱ्या काळात वैजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना, असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com