Dinkar Mane : दिनकर माने देशमुखांना धक्का देणार ; मारुती महाराज कारखान्याची निवडणूक लढवणार?

Political News : माजी आमदार दिनकर माने यांनी मांजरा परिवाराचे नेते अमित देशमुख यांना खडेबोल सुनावले होते.
Dinkar mane, Amit deshmukh
Dinkar mane, Amit deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Political News : संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सेनेचे माजी आमदार दिनकर माने व मांजरा परिवाराचे नेते अमित देशमुख (Amit deshmukh) यांना खडे बोल सुनावले होते. त्यामुळे या वेळेसच्या निवडणुकीत दिनकर माने देशमुख परिवाराला धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

औसा तालुक्यातील बेलकुंड येथील मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपत आला आहे. गेल्या निवडणुकीत देशमुखांच्या सोबतीला असलेले सेनेचे माजी आमदार तथा माजी चेअरमन दिनकर माने येणाऱ्या निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचे संकेत आहेत. माने स्वतः जरी संचालक मंडळात नसले तरी त्यांचे पुत्र अमित माने यांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यासाठी व इतर कामासाठी घेतलेल्या कर्जावर त्यांनी भरसभेत देशमुखांना खडेबोल सुनावले होते. तेव्हाच पुढच्या निवडणुकीत माने स्वतंत्र लढणार आणि देशमुखांना धक्का देणार हे निश्चित झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dinkar mane, Amit deshmukh
Ajit Pawar Group News : अजितदादांनी कर्जतच्या शिबिरात पुसला ‘पवार आतून एकच आहेत’चा गैरसमज!

शुक्रवारी औशात झालेल्या सेनेच्या बैठकीत स्वतंत्र लढण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मारुती साखर कारखान्याच्या निवडणुकीत नेहमी एकमेकांच्या विरोधात लढणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पहिल्यांदा एकत्र आली आणि त्यांनी भाजपला खातेही उघडू दिले नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र आलेल्या या तीनही पक्षाच्या संचालकांना एकत्र करून कारखाना सुरू झाला. या निवडणुकीत दिनकर माने हे स्वतः न लढता त्यांचे पुत्र अमित माने यांनी निवडणूक लढविली. कारखान्याचे चेअरमन राहिलेल्या दिनकर माने यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून न घेतल्याने त्यांनी मनातील खदखद देशमुखासमोरच बोलून दाखविली होती.

तिरंगी लढतीची शक्यता

हा कारखाना मांजरा परिवारातील समजला जात असल्याने कारखान्यावर पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मांजरा परिवार अर्थात देशमुख गट तयारी करीत असताना माजी चेअरमन दिनकर माने (dinkar mane) यांनीही निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत, तर भाजपनेही निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. परिणामी जर दिनकर माने स्वतंत्रच लढले तर ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.

(Edited by Sachin Waghmare)

श्रीशैल्य उटगे कारखान्यापासून लांबच

गेल्या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत कारखान्यावर मांजरा परिवाराची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल्य उटगे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व सेनेची मोट बांधली होती. निवडणुकीनंतर सहकारमहर्षी दिलीपराव देशमुखांच्या सल्ल्याने त्यांनी कारखाना सुरू करण्यासाठी खूप मेहनत घेतली. आपल्या चाणक्य नीतीने विरोधकांचे सर्व डावपेच हाणून पाडलेले श्रीशैल्य उटगे आता मारुती कारखान्यापासून दूर राहू लागले आहेत. त्यामुळे आघाडीत समन्वय राहिलेला नाही. दिनकर माने यांची सभासदावर असलेली पकड आणि भाजप खाणारी मते गृहीत धरले तर देशमुखांना या निवडणुकीत मोठा हादरा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माने पवारांना सोबत घेऊ शकतात

देशमुखांच्या विरोधात निवडणूक जिंकण्यासाठी दिनकर माने भाजप आमदार अभिमन्यू पवारांना सोबत घेऊ शकतात. असे होऊ शकते अशी कबुलीही यावेळी दिनकर माने यांनी दिली आहे. सहकारात जो सहकार्य करतो तो आपला यावर माने यांचा जास्त विश्वास असल्याने आगामी निवडणुकीत दिनकर माने आणि आमदार पवार यांनी एकत्र निवडणूक लढविली तर नवल वाटू नये.

Dinkar mane, Amit deshmukh
Amit Deshmukh On Cabinet Meeting : मराठवाड्याला काही द्यायचेच नव्हते, तर मग बैठक घेतली कशाला ? अमित देशमुख भडकले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com