Shivsena Thackeray Group: राष्ट्रवादीला मोठा धक्का; हरिश्चंद्र खुलट यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश

Palghar NCP : ऐन निवडणुकीच्या तोंडावरच पालघरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आता शिवसेनेचा ठाकरे गटदेखील 'अॅक्टिव्ह मोड'वर आला आहे. संघटनात्मक बांधणीसाठी पदाधिकाऱ्यांवर नव्या जबाबदाऱ्या सोपवण्याचा धडाका सध्या सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून शेकडो कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करत आहेत.

आता पालघर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हरिश्चंद्र खुलट यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर हरिश्चंद्र खुलट यांनी शिवबंधन बांधले. खुलट यांच्या शिवसेनेच्या प्रवेशामुळे पालघरमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray
Sanjay Raut : पिंपरीत पुन्हा शिवसेनेचा आमदार करण्याचे शिवधनुष्य राऊतांना पेलणार का?

हरिश्चंद्र खुलत यांच्याबरोबरच राष्ट्रवादीतील शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरच पालघरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. हरिश्चंद्र खुलट यांचा पालघर जिल्ह्यामध्ये मोठा जनाधार असून, त्यांनी विकासकामांसाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत.

दरम्यान, हरिश्चंद्र खुलट हे अखिल भारतीय आदिवासी वारली समाज संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात. याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातदेखील त्यांचे योगदान आहे. माजी खासदार लहानू कोम यांचे ते जावई आहेत. त्यांनी ठाकरे गटात केलेल्या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांमध्ये पालघर जिल्ह्यात पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Uddhav Thackeray
Bidri Sugar Factory Election : ‘बिद्री’च्या निवडणुकीत विधानसभेची रंगीत तालीम; मुश्रीफ-घाटगे, महाडिक-पाटील आमने सामने

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Vidyanand Bapat DJ Ban .jpg
dharashiv shivsena
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com