Umarga-Lohara Assembly Constituency : ज्ञानराज माझा भरवशाचा बॅट्समन, त्यांना मंत्री करणार!

Chief Minister Shinde assured that Dnyanraj Chaugule will be minister : आमदार चौगुले 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हॅट्रटिक साधत तीन टर्म मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. शिंदे यांनी आपल्या भाषणात चौगुले यांचे कौतुक केले. `ज्ञानराज हा आमचा लाडका आमदार आहे.
Umarga-Lohara Assembly Constituency
Umarga-Lohara Assembly ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : ज्ञानराज हा आमचा लाडका आमदार आहे, माझ्या भरवशाचा बॅट्समन म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो, अशा शब्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्ञानराज चौगुले यांचे कौतुक केले. एवढेच नाही, तर महायुतीची सत्ता आल्यानंतर ज्ञानराज चौगुले यांना मंत्री करणार, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उमरगा येथे जाहीर सभा झाली.

या सभेत शिंदे यांनी चौगुले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. उमरगा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार ज्ञानराज चौगुले (Dnyanraj Chougule) प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढत आहेत. विकास कामांच्या मुद्यावर ते मतदारांना साद घालत आहेत. आज शुक्रवारी (ता.आठ) सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेने चौगुलेंच्या प्रचारात रंगत आणली.

Umarga-Lohara Assembly Constituency
Umarga-Lohara Assembly Constituency: पाच वर्षात अठराशे कोटींचा निधी, ज्ञानराज चौगुले विजयाचा चौकार ठोकणार?

आमदार चौगुले 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हॅट्रटिक साधत तीन टर्म मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणात चौगुले यांचे कौतुक केले. `ज्ञानराज हा आमचा लाडका आमदार आहे. चौगुलेंना विकास कामांसाठी मागेल तेवढा नव्हे, तर त्यापेक्षाही अधिक निधी दिला आहे. मिळालेल्या निधीचा त्यांना सदुपयोग करत जनतेला अपेक्षित अशी विकास कामे केल्याचे शिंदे म्हणाले.

Umarga-Lohara Assembly Constituency
Eknath Shinde News : '...म्हणून एकनाथ शिंदे यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार नव्हते!'; 'या' नेत्याचा खळबळजनक दावा

चौगुलें हा मतदारसंघावर जीवापाड प्रेम करणारा आमदार असल्याने, यापुढील काळातही त्याला मोठे बळ देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. ज्ञानराज चौगुले हा गरिब कुटुंबातला कार्यकर्ता. त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी काम केले आहे. सव्वादोन वर्षात त्यांनी अठराशे कोटीचा विकास कामाची निधी आणला. विकास काम असो कि, सर्वसामान्यांचे अडचणी, त्यानी दिलेल्या पत्रावर सह्या करायला कधीही नाही म्हटले नाही.

Umarga-Lohara Assembly Constituency
Mahayuti And MVA : विधानसभा निवडणुकीत 'आश्वासनांची स्पर्धा'; पण आर्थिक स्थितीचे काय?

सर्वाधिक पत्रावर सह्या घेणारा आदर्श आमदार म्हणुन मी त्याचे कौतूक करतो. तो माझ्या भरवशाचा बॅट्समन् आहे. आता चौकार लगावणार याची खात्री वाटते, त्यासाठी तुम्ही मतदारांनी साथ द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना केले. राज्याच्या विकासासाठी अनेक धोरणात्मक निर्णय, शेतकरी, कष्टकरी वर्गासाठी केलेल्या कामाची माहिती तसेच तरुणांना दिलेल्या रोजगाराच्या संधीची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

सभेला उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणींनी लाडके भाऊ असलेले मुख्यमंत्री शिंदे यांचे औक्षण केले, आणि आम्ही तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. सभेत कार्यकर्त्यांनी आमदार चौगुलेंना मंत्री करण्याची मागणी केली, तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा 20 तारखेला धनुष्यबाणाचे बटन दाबा, ज्ञानराजला नक्की मंत्री करू, असे आश्वासन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com