Umarga-Lohara Assembly Constituency: पाच वर्षात अठराशे कोटींचा निधी, ज्ञानराज चौगुले विजयाचा चौकार ठोकणार?

Chougule Predicts a Massive Victory Umarga Constituency : आमदार चौगुले यांच्या पाठपुराव्याने पहिल्या दोन टर्ममध्ये निधी मंजूर झाला होता. तिसऱ्या टर्ममध्ये तर विकास कामांच्या निधीने उच्चांक गाठला आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक निधी मंजूर झाल्याने, याच मुद्दावर आमदार चौगुले निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
Dnyanraj Chaouhule
Dnyanraj ChaouhuleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : उमरगा विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात शिवसेनेचे विद्यमान आमदार व उमेदवार ज्ञानराज चौगुले यांनी मागील पंचवार्षीक काळात उमरगा-लोहारा तालुक्यात विविध विकास कामासाठी मंजूर केलेल्या निधीचा मुद्दा सकारात्मक ठरतो आहे.

आमदार चौगुले सलग तीन टर्म उमरगा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. मागच्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात विविध समाजघटकांसाठी आणि सार्वजनिक विकास कामांसाठी मोठा निधी खेचून आणल्याचा दावा केला आहे. हा दावा त्यांच्या विधानसभा निवडणूकीतील चौकारासाठी फलदायी ठरणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ज्ञानराज चौगुले (Dnyanraj Chougule) यांनी अर्थसंकल्प, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, नाबार्ड, जिल्हा वार्षीक योजना, गट ब, आदी योजनेअंतर्गत उमरगा, लोहारा तालुक्यातील रस्ते व पुल बांधकामासाठी सुमारे 495 कोटी 50 लक्ष रूपये, हॅम योजनेतुन पाटोदा लोहारा ते माकणी सास्तूर चौक पेठसांगवी नारंगवाडी नाईचाकुर ते कासारशिरसी रस्त्याची सुधारणा व रुंदीकरणासाठी 180 कोटी रूपये मंजुर.

उमरगा शहरातील अंतर्गत रस्ते, गटारी, नदी घाट सुशोभीकरण, स्ट्रीट लाईट, हायमस्ट, स्मशानभुमी बांधकाम, धार्मीक स्थळांचा विकास, सभामंडप, सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम,अग्नीशमन वाहन व केंद्र बांधकाम आदी विकासकामांसाठी नगरविकास विभागाकडुन 227 कोटी रूपये  मंजुर झाले, त्यातील बहुतांश कामे प्रगतीपथावर आहेत.

उमरगा शहरातील कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठी अमृत 2 अभियान - अंतर्गत 185 कोटी रूपये मंजुर केले असुन योजनेचे प्राथमिक टप्प्यातील कामही सुरु झाले आहे.

Dnyanraj Chaouhule
Dnyanraj Chougule 'ते' तीनवेळा लढले, जिंकले; 3 जिल्ह्यांतून शिवसेनेचे एकमेव आमदार, तरीही उपेक्षित राहिले...

लोहारा शहरातील अंतर्गत रस्ते, नाना-नानी पार्क, नगर पंचायत इमारत, स्ट्रीट लाईट, सभामंडप, धार्मीक स्थळांचा विकास, स्मशानभुमी, कब्रस्थान, अग्नीशमन केंद्र व वाहन, क्रीडांगण आदी विकासकामांसाठी 105 कोटी रूपये मंजुर. लोहारा शहर कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठी 35 कोटी रूपये मंजुर. मुरूम शहरातील अंतर्गत रस्ते, गटारी, पार्क, धार्मीक स्थळांचा विकास, आदी विकासकामांसाठी 15 कोटी रूपये मंजुर.

उमरगा शहरात प्रशासकीय इमारत बांधकामासाठी 24 कोटी 29 लक्ष रूपये व उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारत बांधकामासाठी पाच कोटी रूपये मंजुर झाल्याने काम प्रगतीपथावर आहे. आर.डी.एस.एस. योजनेतुन उमरगा लोहारा तालुक्यातील नऊ ठिकाणी 33/11 के.व्ही. उपकेंद्र उभारण्यास मंजुरी. जलजीवन मीशन अंतर्गत उमरगा लोहारा तालुक्यातील गावांमध्ये कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 269 कोटी 81 रूपये मंजुर.

Dnyanraj Chaouhule
Shivsena News : श्रीनिवास वनगांनंतर आता शिंदे गटाचा आणखी एक बडा नेता तीन दिवसांपासून नॉट रिचेबल

या शिवाय लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे 2115 योजनेअंतर्गत सुमारे 150 गावांमध्ये अंतर्गत रस्ते, गटारी, व्यायामशाळा, सभामंडप, ग्रामपंचायत इमारत बांधकाम, महिला केंद्र, स्मशानभूमी बांधकाम करण्यासाठी 30 कोटी रुपये मंजूर. मनरेगा अंतर्गत उमरगा लोहारा तालुक्यातील विविध गावांमध्ये अंतर्गत सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी 30 कोटी रूपये मंजुर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतुन अंतर्गत मागासवर्गीय वस्त्यांत रस्ते, समाजमंदिर, स्मशानभूमी आदी विकासकामांसाठी 20 कोटी रुपये मंजूर.

सालेगाव (ता. लोहारा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थीविहार बांधकामासाठी 11 कोटी रूपये व कराळी (ता. उमरगा) येथे भीम पार्क उभारण्यासाठी 15 कोटी रूपये निधीतुन काम सुरु आहे. चिंचोली पळसगाव साठवण तलावाच्या उर्वरित कामासाठी 24 कोटी रूपये मंजुर. तालुका क्रीडा संकुल, उमरगा (गुंजोटी) साठी तीन कोटी रुपये व तालुका क्रीडा संकुल लोहारा (जेवळी) साठी पाच कोटी रुपये मंजूर.

अल्पसंख्यांक विभागाअंतर्गत उमरगा शहरातील इदगाह मैदान संरक्षक भिंत, सय्यदबाशा सभागृह, लोहारा शहरातील कब्रस्तान व सुमारे 33 गावांत मुस्लीम मोहल्लयात सभागृह, शादीखाना बांधकाम, कब्रस्थान संरक्षक भिंत, मशीद संरक्षक भिंत, स्ट्रीट लाईट आदी कामांसाठी सुमारे चार कोटी 50 लक्ष रूपये निधी मंजूर.

Dnyanraj Chaouhule
Dharashiv Assembly Election : धाराशिवमधील सेनेच्या बालेकिल्ल्यात विधानसभेला कोण बाजी मारणार ?

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत उमरगा लोहारा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील सभामंडप, विंधन विहीरी, स्मशानभुमी, हायमस्ट, स्ट्रीट लाईट आदी विकासकामांसाठी सुमारे 20 कोटी 15 लक्ष रूपये उपलब्ध करून दिले. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत सुमारे 250 कि.मी. रस्त्यासाठी 60 कोटीची मंजूरी. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून बंजारा, धनगर समाजांच्या वस्त्यांसाठी 14 कोटी 19 लक्ष रूपये रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत वर्गखोली बांधकाम, शाळा दुरुस्ती, तीर्थक्षेत्र विकास, खुली व्यायामशाळा, आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती, विविध गावांमध्ये स्मशानभूमी, रस्ते, खुली व्यायामशाळा, गावांतर्गत रस्ते, विद्युत रोहित्रे आदी कामांसाठी सुमारे 30 कोटी रूपये मंजुर. गौण खनिज विकास निधीतुन चार गावांमध्ये 10 वर्गखोल्या बांधकामासाठी एक कोटी रूपये मंजुर. स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत माडज, गुगळगाव, एकोंडी लो., दस्तापुर, पळसगाव, नागराळ, कराळी, वरनाळवाडी व विलासपुर पांढरी या पाच गावांमध्ये ग्रामपंचायत इमारती बांधकाम करणे एक कोटी 50 लक्ष रुपये मंजूर.

Dnyanraj Chaouhule
Umarga Congress News : काँग्रेसमधील वादावादीनंतर प्रकाश आष्टे यांच्या सचिव पदाला ब्रेक..

जलसंधारण विभागाअंतर्गत उमरगा व लोहारा तालुकयातील विविध गावांमध्ये चेक डॅम बांधकाम करणे 37 कोटी 53 लक्ष रूपये मंजूर. उमरगा व मुरूम येथील बसस्थानकाचे नुतनीकरण व पुनर्बाधणीसाठी प्रत्येकी पाच कोटी रूपये मंजुर. असे एकुण एक हजार 853 कोटी रूपयाचा निधी मंजूर करुन आणल्याचा दावा ज्ञानराज चौगुले यांनी केला आहे.

1952 पासुन विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या. प्रारंभीच्या तत्कालिन स्थितीत निधी कमी असायचा. 1995 पासुन मतदारसंघात विकास कामांसाठी निधी चांगल्या प्रमाणात मंजूर व्हायचा. मात्र आमदार चौगुले यांच्या पाठपुराव्याने पहिल्या दोन टर्ममध्ये निधी मंजूर झाला होता. तिसऱ्या टर्ममध्ये तर विकास कामांच्या निधीने उच्चांक गाठला आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात मोठा निधी विकासकामांसाठी मंजूर झाल्याने, याच मुद्दावर आमदार चौगुले निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com