Manoj Jarange: "...त्या पक्षाला २०२९च्या निवडणुकीत निवडून द्यायचं नाही"; नारायणगडावरुन मनोज जरांगेंचे स्पष्ट निर्देश

Manoj Jarange: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा बीडच्या नारायणगडावर साजरा झाला. नेहमीप्रमाणं त्यांच्या मेळाव्याला तुफान गर्दी झाली होती.
Manoj Jarange
Manoj Jarange
Published on: 
Updated on: 

Manoj Jarange: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा बीडच्या नारायणगडावर साजरा झाला. नेहमीप्रमाणं त्यांच्या मेळाव्याला तुफान गर्दी झाली होती. यावेळी जरांगेंनी भाषणात अनेक खळबळजनक दावे केले, तसंच पुढच्या २०२९च्या विधानसभा निवडणुकीत विशिष्ट राजकीय पक्षाला निवडून द्यायचं नाही, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी समाजबांधवांना दिले. त्यामुळं हा पक्ष नेमका कोणता? यावरुन आता चर्चा रंगली आहे.

नारायणगडावरुन बोलताना जरांगे म्हणाले, "आपला समाज कधी उन्हात तळला नाही, कधी त्यानं पाऊस अंगावर घेतला नाही. पण आता मात्र समाज हटायला तयार नाही. सगळ्यात मोठी पोटदुखी ही आहे. मी समाजाच्या लेकरांना आरक्षण मागतोय तर हे माझ्याच मागे लागलेत. मी इमानदारीनं काम करतोय तर हे माझ्याच मागे लागले आहेत. काय चूक करतोय मी? या पवित्र नारायणगडावरुन सांगतो, या समाजाची मान खाली होईल असं एकही पाऊल मी उचललेलं नाही आणि आयुष्यात उचलणार नाही. मी ज्या समाजाला मायबाप म्हटलं त्या समाजाची लेकर मोठी करण्याची जबाबदारी माझी आहे"

Manoj Jarange
Mohan Bhagwat: "आंदोलनं तोडग्यासाठी झाली पाहिजेत, सरकार बदलण्यासाठी नाही"; मोहन भागवतांनी विरोधकांना संबोधलं 'आसुर'

"तुमचं ऐकायला मी काही तुमचा नोकर नाही. त्यांचं म्हणणं आहे मी म्हणतोय तसं वागा कारण आम्ही आरक्षण दिलंय, जर वागला नाही तर याच्यापुढं देणार नाही, त्यामुळं आमच्याविरोधात भांडू नका. पण असं कसं होईल माझ्याकडून... मी माझ्या समाजासाठी भांडायचं नाही? त्यांच्यासाठी मागणी करायची नाही? तर मग मी माझ्या समाजाशी धोका करतोय"

Manoj Jarange
Manoj Jarange Patil : "एकनाथ शिंदेंनी माझ्या नावाने भाजपकडून 500 कोटी घेतले..."; मनोज जरांगेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

मी तीन वर्षाच्या काळात आगोदर कोणालाही स्वतःहून बोललेलो नाही. पण जो आमच्याविरोधात बोलेल त्याचा इथून पुढं बाजार उठेल हे आजच सांगतो. जो जो नेता, जो जो पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, तो पक्ष २०२९ला निवडून येऊ द्यायचा नाही. जो आपल्यासाठी नाही तो आपला नाही, अशा शब्दांत स्पष्ट निर्देश मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना दिले आहेत. सगळे तयार आहेत का २०२९ साठी? अशी हाकही यावेळी मनोज जरांगे यांनी उपस्थितांना दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com