Mohan Bhagwat: "आंदोलनं तोडग्यासाठी झाली पाहिजेत, सरकार बदलण्यासाठी नाही"; मोहन भागवतांनी विरोधकांना संबोधलं 'आसुर'

Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नागपुरातील विजयादशमीच्या कार्यक्रमात मंगळवारी स्वयंसेवकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करताना देशातील सध्याच्या आंदोलनांवरुन विरोधकांवर घणाघाती टीका केली.
Mohan Bhagwat at RSS Vijayadashmi Programme Nagpur
Mohan Bhagwat at RSS Vijayadashmi Programme NagpurMohan Bhagwat at RSS Vijayadashmi Programme Nagpur
Published on: 
Updated on: 

Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नागपुरातील विजयादशमीच्या कार्यक्रमात मंगळवारी स्वयंसेवकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करताना देशातील सध्याच्या आंदोलनांवरुन विरोधकांवर घणाघाती टीका केली. देशात सध्या वाईट शक्ती भारताला संपवण्याचं काम करत आहेत, काही महत्वाकांक्षी नेत्यांनी या शक्तींसोबत हातमिळवणी केली आहे, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता कॉक्रोच जनता पार्टी आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.

भागवत म्हणाले, "भारतात फ्रान्स आणि बांगलादेश सारखी स्थिती निर्माण केली जात आहे. जगात अशा शक्ती आहेत, जी भारताला दाबू पाहत आहे. त्यांचा हेतू सत्तांतर घडवून आणून परिस्थिती बदलणं हा नाही तर स्वतःला सत्तेत बसवणं आहे"

आंदोलन तोडग्यासाठी व्हायला हवीत, सत्ता बदलासाठी नाही - भागवत

कोणत्याही लोकशाही देशात जेव्हा समस्या असतात, तेव्हा आंदोलनं होत असतात. पण आंदोलनं तोडग्यासाठी व्हायला हवीत. आंदोलन करणारा कोणताही समूह असू द्यात, अखंड समाजात कोणत्याही प्रकारचं विभाजन, द्वेष होता कामा नये. आंदोलनामुळं समस्येवर तोडगा निघतो अशी उदाहरणं तशीही कमीच आहेत, असंही भागवतांनी म्हटलं आहे.

Mohan Bhagwat at RSS Vijayadashmi Programme Nagpur
Amravati DCC Bank: बच्चू कडूंना विधानसभेला धूळ चारलेला नेता पुन्हा मैदानात : भाजप आमदाराकडून जिल्हा बँकेसाठी पॅनेलची तयारी

सत्तापरिवर्तन झालं नाही अन् होणारही नाही

भागत पुढे म्हणाले की, "पश्चिमेकडून एक वावटळ उठली आहे, जी प्रत्येक संस्कृतीच्या विरोधात आहे आणि भारताची संस्कृती नष्ट करु इच्छिते. फ्रान्समध्ये काय सुरु आहे? नेपाळ, बांगलादेशात काय झालं? ते म्हणतात की 'रिजीम चेंज' (सत्ताबदल) केल्यास परिस्थिती बदलू, पण असं यापूर्वी कधी झालेलं नाही आणि पुढेही कधी होणार नाही"

भारत आसुरी शक्तींकडून लक्ष्य

मोहन भागवत म्हणाले की, "भारतात देखील असे प्रयत्न होत आहेत, पण गेल्या वर्षी ज्या धोरणावर भारत चालत होता, त्याच्या पक्क्या नेतृत्वाच्या जोरावर हे चाललं. नव्या पिढीमुळं भारताचा जो पुरुषार्थ बनला त्यामुळं आसुरी शक्तींचा खेळ बंद झाला. त्यामुळं आता भारत त्यांचं लक्ष्य आहे"

Mohan Bhagwat at RSS Vijayadashmi Programme Nagpur
Gokul Election : स्थानिक स्वराज्य संस्था, शक्तिपीठविरोधी लढा अन् आता गोकुळ; एकाकी पडलेल्या सतेज पाटलांना राजू शेट्टींची खंबीर साथ!

जगात भारताला दाबू पाहणाऱ्या शक्ती

भागवतांनी यावेळी विरोधीपक्षांवर आंदोलनांना चुकीच्या मार्गावर नेत असल्याचा आरोपही केला. समाजाच्या सक्रीयतेमुळं अडचणींवर तोडगा निघाल्याची अनेक उदाहरणं आहेत. समाज आणि देशाला केवळ नेते मंडळी चालवत नाहीत, तर समाज देशाला चालवत असतो. आंदलनं जर दुसऱ्या हेतूनं केली गेली तर ती राजकारणाचं साधन बनतात. विरोध भडकवण्याचं काम करतात. समाजाशी तोडून एक वेगळा वर्ग बनवणं आणि व्यवस्थेबाबत विरोधाचं वातावरण तयार करणं. यापूर्वीपासून हे होत आलं आहे, आजही होत आहे. जगात भारताला दाबणाऱ्या शक्ती अस्तित्वात आहेत. त्यामुळं कशानंही उत्तेजित होण्याची गरज नाही, आपल्याला सातत्यानं प्रयत्न करावे लागतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com