Ambadas Danve On Abdul Sattar : कृषीमंत्री सत्तारांच्या भ्रष्टाचाराला फडणवीसांचा पाठिंबा आहे काय ?

Shivsena : कृषी विभागात किटकनाशक खरेदी निविदेत १५० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय.
Abdul Sattar-Ambadas Danve News
Abdul Sattar-Ambadas Danve News Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या हिताचे काम करण्यासाठी खरतरं कृषी विभाग असतो. (Ambadas Danve On Abdul Sattar) पण सध्या कृषी विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. एजंट, दलालांचे हा विभाग केंद्र बनले असून मंत्र्यासह काही शासकीय अधिकारी देखील यात गुंतलेले असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

Abdul Sattar-Ambadas Danve News
Dhananjay Munde Letter to Sattar : सत्तारसाहेब अधिकची पथक नेमा, शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा..

अकोला येथे बियाणे विक्रेत्यांवर धाडी टाकल्यानंतर या धाडी खंडणीसाठी पथकात खाजगी व्यक्ती घुसवून टाकण्यात आल्याचा आरोप झाला. (Abdul Sattar) कृषीमंत्र्यांचा पीए देखील या पथकात आढळल्याने या एकूणच कारवाईवर शंका उपस्थीत करण्यात आली. या धाडीचे प्रकरण अजून शमले नाही तोच कृषी विभागात किटकनाशक खरेदी निविदेत १५० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय.

या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी कृषीमंत्री, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर देखील टीका केली आहे. दानवे यांनी `टीव्ही ९` शी बोलतांना राज्याचा कृषी विभाग हा भ्रष्टाचाराचा अड्डा बनल्याचा आरोप केला आहे. (Shivsena) या विभागात एजंट, दलाल जमा झाले असून मंत्री, अधिकारी देखील यात गुतलेले आहेत.

अकोला येथील एक भटकळ नावाच्या खाजगी व्यक्तीच्या विरोधात तक्रारी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली. पण त्याच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. कृषीमंत्री अब्दुल सत्तार व त्यांच्या विभागाकडून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे की काय? अशी शंका या निमित्ताने उपस्थितीत होते.

राज्यातील शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी, त्यांना योग्य मार्गदर्शन करून मदतीसाठी कृषी विभागाने काम करणे अपेक्षित आहे. मात्र हा संपुर्ण विभागच भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे, हे मी जबाबदारीने बोलतो आहे, असेही दानवे म्हणाले.

Edited by : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com