

Marathwada : आधी शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्याचे चित्र निर्माण करून राज्यातील सरकारमध्ये अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांचा समावेश करून घेतला. (Aimim Celebration News) ईडी, सीबीआय आणि इन्कमटॅक्स धाडींच्या दबावाखाली हे सरकार स्थापन करण्यात आल्याचा आरोप करत एमआयएमने आज उपरोधिक आनंदोत्सव साजरा केला.
खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंनदोत्सवात स्वतः इम्तियाज यांनी फटाके फोडले. ढोल-ताशे वाजवत या नव्या सरकारचे अभिनंदन यावेळी करण्यात आले. (AIMIM) मोदी वाॅशिंग पावरडर लिहलेले पोस्टर आणि फलक हातात घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जु्न्या व्हिडिओ क्लीप देखील यावेळी सर्वसामान्यांना दाखवण्यात आल्या.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दोन दिवसांपुर्वी भाजप सरकारला पाठिंबा देत स्वतःसह इतर ९ जणांचा मंत्रीमंडळात समावेश करवून घेतला. (Marathwada) राष्ट्रवादीतील या बंडामुळे राज्यात भूकंप झाल्याची चर्चा असली तरी एमआयएमने हा सगळा नियोजित आणि ठरवून केलेला कार्यक्रम असल्याची टीका केली होती.
इम्तियाज जलील यांनी तर हे सरकार म्हणजे ईडी सरकार आहे, असा आरोप करत ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या धाडी टाकून किंवा त्यांच्या धमक्या देवून स्थापन झाले असल्याची टीका केली होती. आधी शिंदे आणि पन्नास आमदारांना याच दबावतंत्राचा वापर करून पक्ष फोडण्यात आला.
त्यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादीच्या बाबतीतही हेच घडले. या सगळ्याच राजकीय पक्षांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काहीच देणेघेणे राहिलेले नाही, अशी टीका इम्तियाज यांनी केली होती. या गलिच्छ राजकारणाचा आणि ते करणाऱ्या नेत्यांना निषेध म्हणून हा उपरोधिक आनंदोत्सव आज साजरा करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.