मंत्री महोदयांच्या उपचारादरम्यान पाच मिनिटं लाईट गेली अन् लगेच जनरेटर मंजूर झालं...

Ambadas Danve : लाईट गेल्यास सर्वसामान्यांचे ऑपरेशन थांबतात मात्र...
Opposition Leader Ambadas Danve-Minister Sandipan Bhumre News
Opposition Leader Ambadas Danve-Minister Sandipan Bhumre NewsSarkarnma
Published on
Updated on

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटातील नेते आणि शिवसेनेतील नेत्यांमध्ये जोरदार संघर्ष बघायला मिळत आहे. सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे समर्थक नेते आणि बंडखोरामध्ये वारंवार खटके उडत आहेत.

दरम्यान औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) आणि विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्यात मंत्री संदिपान भुमरे यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान दंतोपचार घेताना लाईट गेल्यावर त्या रुग्णालयाला जनरेटर मंजूर केल्यावरून त्यांनी भुमरे यांच्यावर टीका केली आहे. (Opposition Leader Ambadas Danve-Minister Sandipan Bhumre News)

Opposition Leader Ambadas Danve-Minister Sandipan Bhumre News
Election Commission : सुट्टी घेऊन मतदानाला दांडी मारणाऱ्यांनो ही बातमी नक्की वाचा...

औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre)यांनी नुकताच सरकारी रुग्णालयातील सोयी सुविधांचा आढावा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात दंतोपचार घेतले. मात्र त्यांच्या उपचारादरम्यान पाच मिनिटांसाठी लाईट गेल्याने रुग्णालय स्टाफची मोठी तारांबळ उडाली होती. परंतू यानंतर पालकमंत्री महोदयांनी ही अडचण बघता लगेच जनरेटर मंजूर केले. यावरुन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आता प्रत्येक सरकारी रुग्णालयात मंत्र्यानं घेऊन फिरावे का? असा सवाल उपस्थित करून टोला लगावला आहे.

मंत्री भुमरे यांच्या दातांची तपासणी दरम्यान हर्सूल केंद्रावरून वीज गेल्याने यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. त्यानंतर तातडीने महावितरण अधिकाऱ्यांना संपर्क करण्यात आला. मात्र तोपर्यंत मोबाइलचे टॉर्च लावून त्यांची तपासणी करण्यात आली. याबाबत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.पी. डांगे म्हणाले की, पाच वर्षांपासून जनरेटरचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडे पडून असून शुक्रवारी विजेची समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मंत्री भुमरेंनी लगेच जनरेटर मंजूरीचे निर्देश दिले. मात्र यावरुन अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

Opposition Leader Ambadas Danve-Minister Sandipan Bhumre News
Sandeep Deshpande : ‘आत’मध्ये संजय राऊत साहेबांचा वेळ जात नाहीये, म्हणून...

दानवे म्हणाले की, सरकारी रुग्णालयात लाईट गेल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे अनेक ऑपरेशन थांबतात. मात्र, आमचे मंत्री महोदयांना त्रास झाल्याबरोब लगेचचं जनरेटर मिळालं आहे. यामुळे आता सर्व रुग्णालयामध्ये या मंत्र्यांना घेऊन जावं का म्हणजे तेव्हाच तेथील प्रश्न सुटतील का?,असा खोचक सवाल केला आहे.

दरम्यान,औरंगाबाद येथील ज्युबिली पार्क परिसरात काही अडचण झाल्यास लाईट जाते. त्यामुळेच जनरेटरचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच इतर फीडरवरून आणखी वीज कनेक्शन दिल्यास चोवीस तास वीज मिळू शकते. मात्र पालकमंत्र्यांनी आता तात्पुरते जनरेटर उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्याने येथे तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र याआधी शासकीय दंत महाविद्यालयात मराठवाडा विकास मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष दंत उपचारासाठी आले असता त्यांना दुसऱ्या मजल्यावर जावे लागले त्यावेळी देखील लिप्टची सुविधा नव्हती. त्यानंतर पाठपुरावा केल्यानंतरचं लिप्ट सुरू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे. मात्र या मुद्द्यावरून दानवे यांनी मंत्री भुमरेंना चिमटा काढायला विसरले नाहीत. आता भुमरे यावर काय स्पष्टीकरणं देतात हे बघावं लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com