Marathwada NCP MLAs: मराठवाड्यातील आठ आमदार अजितदादांकडे, तर दोघे शरद पवारांसोबत..

Marathwada NCP MLA Supports Of Ajit Pawar: भूमिका स्पष्ट न करता सस्पेन्स वाढवणारे राजेश टोपे हे शरद पवारांच्या उपस्थितीतील मेळाव्यात हजर होते.
Sharad Pawar - Ajit Pawar
Sharad Pawar - Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Marathwada NCP News: अजित पवारांनी बंड करत चाळीस आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. (Ncp Political Crisis News) आपल्याकडे चाळीस आमदारांच्या समर्थनाचे पत्र असल्याचा अजित पवारांनी दावा केल्यानंतर आज मुंबईत दोन्ही राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले होते. अखेर कोण आमदार अजित पवारांकडे आणि कोण शरद पवारांकडे? हे स्पष्ट झाले आहे.

Sharad Pawar - Ajit Pawar
Ajit Pawar On BRS News : ठाकरेंच्या शिवसेना अन् काॅंग्रेसपेक्षा अजित पवारांना बीआरएस-वंचितची धास्ती..

मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या (Sharad Pawar) शरद पवारांच्या मेळाव्यात मराठवाड्यातील दहा (दोन विधान परिषद) आमदारांपैकी दोघेच उपस्थितीत होते. बीडचे संदीप क्षीरसागर (NCP) यांनी `सदैव साहेबांसोबतच`, अशी पोस्ट व्हायरल करत आपली भूमिका जाहीर केली होती. त्यानूसार आज ते यशवंतराव चव्हाण सभागृहातील मेळाव्यात हजर होते.

तर गेल्या तीन दिवसांपासून आपली भूमिका स्पष्ट न करता सस्पेन्स वाढवणारे घनसावंगीचे आमदार तथा माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे हे देखील आज शरद पवारांच्या उपस्थितीतील मेळाव्यात हजर होते. (Marathwada) तर अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात माजलगांवचे आमदार प्रकाश सोळुंके, मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण, मराठवाडा शिक्षकचे विक्रम काळे, आष्टी-पाटोदाचे बाळासाहेब आजबे, अहमदपूरचे बाबासाहेब पाटील, वसमतचे राजू नवघरे उपस्थीतत असल्याचे सांगितले जाते.

धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांनी तर अजित पवार यांच्यासोबतच मंत्रीपदाची शपथ घेतली होती. बीडचे संदीप क्षीरसागर हे २०१९ मध्ये पहिल्यांदाच आपले काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करून विधानसभेवर निवडून गेले आहेत. तर राजेश टोपे हे घनसावंगी मतदारसंघातून सलग तीनवेळा विजयी झालेले आहेत.

राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना दोनवेळा मंत्रीपदाची संधी मिळाली होती. राज्यात काॅंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तर २०१९ च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोग्य मंत्री होते. कोरोना काळात टोपे यांनी केलेल्या कामाचे कौतुक शरद पवार यांनी आपल्या `लोक माझे सांगाती` आत्मचरित्रात देखील केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com