Sanjay Jadhav : केंद्रीय मंत्रिमंडळात ठाकरेंना सोडून गेलेल्या खासदाराला संधी? संजय जाधव म्हणतात, 'हरकत काय?'; मंत्री होण्याची इच्छाही केली व्यक्त

Parbhani Politics : एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पाडत सहा खासदार गळाला लावले.
Parbhani Politics; MP Sanjay Jadhav
Parbhani Politics; MP Sanjay Jadhavsarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : एकनाथ शिंदे यांनी राबवलेल्या ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार त्यांच्या गळाला लागले. ऑपरेशन टायगर फत्ते झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिल्ली वारी करत मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या आणखी दोन खासदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्याचे प्रयत्न केला आहे.

यात प्रामुख्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मराठवाड्यातील धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून तीन टर्म निवडून आणले संजय जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. आता खासदार संजय जाधव यांनी आपल्याला केंद्रात मंत्री होण्याची इच्छा असल्याचे आज उघडपणे बोलून दाखवले. दरम्यान येत्या सात तारखेला एकनाथ शिंदे हे परभणी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळातील विस्तारात तुम्हाला संधी मिळणार का? या प्रश्नावर संजय जाधव यांनी थेट मंत्री होण्याची आपली इच्छा असल्याचे स्पष्ट केले. मंत्री व्हायला कोणाला नाही आवडणार असा उलट सवाल करत नशिबात असेल तर नक्कीच मंत्रिपद मिळेल, अपेक्षा बाळगायला काय हरकत आहे? असे जाधव म्हणाले.

Parbhani Politics; MP Sanjay Jadhav
Sanjay Jadhav: खासदार संजय जाधवांवर दबाव होता का? म्हणाले, उद्धव ठाकरेंवर नाराजी नाही, इच्छा नसताना निर्णय...

राजकारणामध्ये नशिबात असेल तर मिळतेच आणि तुमच्या नशिबात नसेल तर ते कधीच मिळत नाही याचा अनुभव अनेकदा आलेला आहे. केंद्रात मंत्री पद मिळाले तर परभणी जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळेल. मंत्रीपद नाही मिळाले तरीही माझे काम सुरूच राहील, असे जाधव यांनी स्पष्ट केले.

एकीकडे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपण मंत्रिपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेला नाही, मला दिले तरी मी केंद्रात मंत्रिपद घेणार नाही, असे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे खासदार संजय जाधव यांनी मात्र आपल्याला मंत्रीपदाची अपेक्षा असल्याचे स्पष्ट सांगून टाकले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि त्यात कोणाला संधी द्यायची हे निश्चित झाले असल्याचे बोलले जाते. संजय जाधव यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या जिल्ह्यात शेतकरी संवाद मेळावा घेत दौरा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे 28 जून रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह परभणी दौऱ्यावर येऊन गेले.

Parbhani Politics; MP Sanjay Jadhav
Sanjay Jadhav: 'ठाकरे घराण्यावर टीका नको, बाकी कोणाच्या बापाला मोजायची गरज नाही' संजय जाधवांनी स्पष्ट केली भूमिका

उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत व परभणीतील स्थानिक नेत्यांनी संजय जाधव यांच्यावर तोंडसुख घेतले होते. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला एकनाथ शिंदे हे शेतकरी संवाद मेळाव्यातून प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. संजय जाधव यांच्या पक्षांतरानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिल्याच परभणी दौरा असणार आहे. या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असून संजय जाधव यांचे हजारो समर्थक शेतकरी संवाद मिळाव्यात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com