Sanjay Jadhav: 'ठाकरे घराण्यावर टीका नको, बाकी कोणाच्या बापाला मोजायची गरज नाही' संजय जाधवांनी स्पष्ट केली भूमिका

Sanjay Jadhav, Uddhav Thackeray, Shiv Sena: शिंदे गटात प्रवेश केल्यानंतरही खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका न करण्याची भूमिका जाहीर केली. समर्थकांनाही संयम बाळगण्याचे आवाहन केले.
Uddhav Thackeray, Sanjay Jadhav
Uddhav Thackeray, Sanjay JadhavSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News: ठाकरे घराण्याशी आपली बांधिलकी आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या दोन नेत्यांवर टीका करायची नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, ज्याचे खावे मीठ त्याचे करावे नीट. आपले जुने नेते, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी आपल्यावर काही टीका केली तरी ते फुलं समजून सोडून द्यायचं. या दोन नेत्यांवर टीका करायची नाही ही माझी भूमिका आहे, त्यामुळे जी माझी भूमिका तीच तुमची देखील असली पाहिजे. हे दोन नेते सोडून इतर कोणाच्या बापाला मोजायची गरज नाही, अशी स्पष्ट भूमिका परभणीचे खासदार संजय जाधव यांनी जाहीर केली.

Uddhav Thackeray, Sanjay Jadhav
MNS News: एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले, तिकडे राज ठाकरेंचा मनसेबाबत तडकाफडकी मोठा निर्णय

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 'जय महाराष्ट्र' करत परभणीचे खासदार संजय जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. सहा खासदार पक्ष सोडून गेल्यानंतर ते आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. संजय जाधव यांचे काल परभणीत त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत केले. यावेळी केलेल्या भाषणात संजय जाधव यांनी आपण स्वतः आणि इतर कोणीही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करायची नाही, अशी भूमिका घेतली. आपल्या समर्थक आणि शिवसैनिकांनाही त्यांनी ठाकरे घराण्यावर टीका न करण्याची किंवा त्यांच्या कुठल्याही आरोपावर, टीकेवर प्रतिक्रिया देऊ नये, अशी विनंती केली.

Uddhav Thackeray, Sanjay Jadhav
Aditya Thackeray: ठाकरेंच्या खासदाराच्या मनात नेमकं काय? ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरु असतानाच संजय जाधव यांचा आदित्य ठाकरेंना खास मेसेज

संजय राऊत यांनी आम्हाला तुडवण्याची भाषा केली, पण ही भाषा त्यांच्या तोंडून शोभत नाही. तुम्ही मोठे नेते आहात, देशपातळीवर काम करतात तेव्हा त्यांनी शब्द जपून वापरले पाहिजे. ते आयते खासदार झाले, लोकांमधून ते कधी निवडून आलेले नाहीत, त्यामुळे त्यांना जनतेचे प्रश्न भावना कळत नाही. त्यामुळे कोण आरोप, प्रत्यारोप करतयं त्याकडे लक्ष देऊ नका. मला एका धुळ्याच्या व्यक्तीचा फोन आला होता, त्याला मी तू माझा मतदार नाही, ज्यांनी मला निवडून दिलं त्यांना मी उत्तर देईल, असे सांगीतले.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी आपले वैचारिक मतभेद असले तरी आता आपण जो निर्णय घेतला आहे, तो विकास कामे करून दाखवण्यासाठी घेतला आहे. आता आपल्याला त्या गोष्टी करून दाखवायच्या आहेत, असेही खासदार जाधव यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोन व्यक्तींनी आम्हाला शिव्या घातल्या तरी त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही, ते आपल्यावर गुलाबाचे फुलं टाकतायेत असं समजा, याचा पुनरुच्चारही जाधव यांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com