Beed Crime : बीडमध्ये तक्रार मागे घेण्यासाठी तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला; शिंदेंच्या बड्या नेत्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल

Beed Politics News : बीडमध्ये जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुखाचे नाव समोर आले आहे.
Nashik Crime News | Woman Attack Case | Murder Attempt
Nashik Crime News | Woman Attack Case | Murder AttemptSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. जुन्या वादातून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  2. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

  3. पिंपळनेर पोलीस ठाण्यात Attempt to Murder सहित गंभीर कलमांखाली प्रकरण नोंदवले आहे.

Beed Crime News : जुन्या वादातून पोलीसात दाखल झालेल्या तक्रारीनंतर नोंद झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह सात जणांनी कुऱ्हाडीने मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रारीवरून पोलीसांनी सात जणांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे.

जुन्या वादातून पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली होती. या आधारे संबंधितांवर पोलीसांनी गुन्हा नोंद केला होता. ती तक्रार आणि गुन्हा मागे घ्यावा यासाठी संबंधित व्यक्ती तक्रारदारावर सातत्याने दबाव आणत होते. याच प्रकरणातून बीडच्या म्हाळसजवळा गावातील एका तरुणाला सात जणांनी काठ्या कुऱ्हाडीने जबर मारहाण केली.

या प्रकरणात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह सात जणांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात प्रभाकर खांडे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Nashik Crime News | Woman Attack Case | Murder Attempt
Beed crime news : बीडच्या गुन्हेगारीनं राज्याला पुन्हा हादरवलं! विवाहितेला घरातून उचललं, अत्याचारानंतर गावच्या चावडीवर बांधलं

प्रभाकर खांडे याच्या भावाबरोबर कुंडलिक खांडे आणि त्याच्या साथीदारांचे यापूर्वी वाद झाले होते. त्यातून गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी संबंधित तरुणावर सातत्याने दबाव आणला जात होता, असा दावा तक्रारदाराने केला आहे. आरोपींनी यापूर्वीही ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर देखील हल्ला केला होता, अशी माहिती आहे.

त्यानंतर आता प्रभाकर खांडे यांच्यावर हल्ला झाल्याने खांडे कुटुंब दहशतीत वावरत आहे. आम्हाला गाव सोडावे लागते की काय? अशी भीती ज्ञानेश्वर खांडे यांनी व्यक्त केली. सध्या या हल्ल्याचातपास पिंपळनेर पोलीस करत आहेत. गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यात गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. जीवघेणे हल्ले, शस्त्रांचा वापर यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Nashik Crime News | Woman Attack Case | Murder Attempt
Beed Crime News: संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपी तुरुंगाबाहेर येण्याआधीच बीडमध्ये मोठं कांड, डोळ्यात मिरची पूड फेकली,लोखंडी रॉड अन् कत्तीनं वार...

FAQs :

1. या प्रकरणात कोणावर गुन्हा दाखल झाला आहे?
कुंडलिक खांडे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2. हल्ल्याचे कारण काय होते?
जुन्या वादातून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे सांगितले जात आहे.

3. कोणत्या प्रकारचा हल्ला झाला?
कुऱ्हाडीने मारहाण करून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

4. गुन्हा कुठे नोंदवला गेला आहे?
पिंपळनेर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

5. पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे?
सात आरोपींविरोधात Attempt to Murder आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com