Shivsena News : एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याने शिवसेनेत उत्साह, पण नेत्यांचे मनोमिलन होईल का ?

Eknath Shinde’s tour has brought fresh enthusiasm within Shiv Sena : बैठक झाल्यानंतर जिल्ह्यातील सगळे आमदार पक्षाच्या मेळाव्याला हजर होते. पण सत्तारांनी तिथे येणे टाळले आणि ते मतदारसंघात निघून गेले.
Chhatrapati Sambhajinagar Shivsena News
Chhatrapati Sambhajinagar Shivsena NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambajinagar : लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घवघवीत यश मिळाले. खासदार आणि सहा आमदार निवडून आणत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही पक्षाने जोरदार मुसंडी मारली. विधानसभा निवडणुक झाल्यानंतर तब्बल चौदा महिन्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरचा दौरा केला. हा दौरा, त्याला मिळालेला प्रतिसाद, लाडक्या बहीणींची गर्दी या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर शिंदे यांच्या काही तासांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांचा विश्वास कमालाची वाढलेला दिसला.

एकीकडे ही जमेची बाजू असली तरी पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat), मंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल या तीन नेत्यांमधील मतभेद मात्र कायम असल्याचे दिसून आले. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मराठवाड्यातील आमदारांच्या विभागीय बैठकीत अब्दुल सत्तार यांनी हजेरी लावली. एकनाथ शिंदे यांचे स्वागत करत त्यांच्याशी संवादही साधला. सत्तार यांचा राग शिंदेंवर नाही, तर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर असल्याचे यावेळी दिसून आले. दोघे ऐकमेकांच्या शेजारी बसले पण त्यांच्या संवाद मात्र झाला नाही. बैठक झाल्यानंतर जिल्ह्यातील सगळे आमदार पक्षाच्या मेळाव्याला हजर होते. पण सत्तारांनी तिथे येणे टाळले आणि ते मतदारसंघात निघून गेले.

तर संत एकनाथ रंग मंदिरात झालेल्या पक्ष मेळाव्यावरही पालकमंत्री संजय शिरसाट यांचीच छाप अधिक दिसून आली. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार वगळता जिल्ह्यातील इतर सगळ्या आमदारांनी या मेळाव्याला हजेरी लावली. शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे हे देखील मेळाव्याला उपस्थित नव्हते. सत्तार-भुमरे यांची अनुपस्थिति खटकणारी असली तरी शिंदे यांचे भाषण, शिवसैनिकांशी तब्बल सव्वा तास साधलेला संवाद लक्षवेधी ठरला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी मोडून काढण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शहरात आणखी दौरे करावे लागतील, असे दिसते.

Chhatrapati Sambhajinagar Shivsena News
Eknath Shinde : आपली 'देना बँक' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंकडे महापालिकेचा रस्त्यांसाठी दोन हजार कोटींचा प्रस्ताव!

शिंदेंचा विश्वास शिरसाट यांच्यावरच..

पालकमंत्री संजय शिरसाट यांना पक्षांतर्गत विरोध अन् राज्य पातळीवर होत असलेल्या भ्रष्टाचार, घोटाळ्याच्या आरोपांना तोंड द्यावे लागत आहे. परंतु एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही असे आरोप होतच असतात, असे म्हणत शिरसाट यांची पाठराखण केली होती. कालच्या दौऱ्यात संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सहज संवाद, हास्यविनोद पाहता कितीही आरोप, तक्रारी झाल्या तरी एकनाथ शिंदे यांचा शिरसाट यांच्यावरील विश्वास कायम असल्याचे स्पष्ट होते.

Chhatrapati Sambhajinagar Shivsena News
Shivsena Politics : "सगळं ठरलंय! राऊतांमुळे 'उबाठा'चा सत्यानाश, 2 आमदार वगळता इतर सर्वजण दसऱ्यानंतर..."; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट

त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शिरसाट यांच्याच नेतृत्वात लढवल्या जाणार हे निश्चित आहे. आता जिल्ह्यातील सगळ्या आमदारांना सोबत घेऊन स्थानिकमध्ये भगवा फडकवण्याचे आव्हान शिरसाट यांच्यासमोर असणार आहे. पालकमंत्री म्हणून संघटनात्मक बांधणीचे सर्वाधिकार शिरसाट यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे चित्र कालच्या मेळाव्यातून पहायला मिळाले. पक्षासाठी स्वतःच्या मालकीचे कार्यालय म्हणजेच शिवसेना भवन उभारण्याची जबाबदारीही शिंदे यांनी शिरसाट यांच्याच खांद्यावर टाकली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com