Uday Samant News : ईव्हीएमवर शंका घेणाऱ्यांना उदय सामंत यांचा सल्ला! राजीनामा द्या अन् पुन्हा निवडणुकीला सामोरे जा..

Industries Minister Uday Samant suggests that those doubting EVMs should resign and face fresh elections : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर की महायुतीत? यावरही सामंत यांनी भाष्य केले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या महायुतीत लढणार आणि जिंकणार, असा दावा त्यांनी केला.
Uday Samant On EVM News
Uday Samant On EVM NewsSarkarnama
Published on
Updated on

हरेंद्र केंदाळे

Shivsena News : विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जातो. या आरोपाला उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी टोला लगावताना सल्लाही दिला. ईव्हीएममध्ये घोटाळा वाटत असेल, तर त्यांनी आपल्या जागेचा राजीनामा द्यावा अन् पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे, असे सामंत यांनी म्हटले आहे.

उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. या दरम्यान, त्यांनी शिवसेना संघटन बांधणीचा आढावा घेतला. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ईव्हीएमवर शंका उपस्थित करून आरोप करणाऱ्या काँग्रेस पक्षासह विरोधकांना सामंत यांनी सुनावले. ईव्हीएममध्ये कुठलाही घोळ नाही हे वारंवार सांगितले गेले. निवडणूक आयोगानेही या संदर्भात खुलासा केला आहे. मात्र तरीही विरोधकांचे समाधान होत नसेल तर त्यांनी खुशाल राजीनामा देऊन नव्याने निवडणुकीला सामोरे जावे, असे सामंत म्हणाले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर की महायुतीत? यावरही सामंत यांनी भाष्य केले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या महायुतीत लढणार आणि जिंकणार, असा दावा त्यांनी केला. एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन मालकाला भेटले,असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. (Shivsena) यावर दिल्लीला पंचपक्वान्न खायला कोण गेले? राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसणारे महाराष्ट्राचे भले करू शकत नाहीत, अशी टीका सामंत यांनी केली.

Uday Samant On EVM News
Uaday Samant : भास्कर जाधवांच्या मतदार संघात शिवसेनेचं ऑपरेशन टायगर? सामंतांची राजकीय खेळी

मनसेशी युती काँग्रेसला न विचारता करणं हा कोणता न्याय आहे? असा टोलाही सामंत यांनी लगावला. शिंदे हे त्यांच्या मुलाला भेटले. भाजप आमचा मोठा भाऊ आहे, आमच्यात कोणतेही वाद नाहीत, समन्वयाने महायुती काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. लाडकी बहिण योजनेत ज्या महिलांनी रक्कम घेतली, ती रक्कम परत घेण्याची गरज नाही. विरोधक निव्वळ नरेटिव्ह सेट करत आहेत.

Uday Samant On EVM News
Eknath Shinde Meet Amit Shah : एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे मन मोकळं केलं! CM फडणवीसांच्या तक्रारीचा पाढा वाचला?

एमआयडीसी नोकरभरतीत कोणाचाही हस्तक्षेप नाही. केंद्रीय संस्थेकडून ही पदभरती होईल, असे स्पष्ट करतानाच कर्जमाफीत निकषात बसणाऱ्या खऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी समिती नेमल्याचे ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी भारतावर लागू केलेल्या टेरिफचा अभ्यास करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. येत्या दोन आठवड्यात याचा किती परिणाम होईल, त्यावर उपाययोजना काय असाव्यात? याची माहिती मिळेल, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com