Eknath Shinde Meet Amit Shah : एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे मन मोकळं केलं! CM फडणवीसांच्या तक्रारीचा पाढा वाचला?

Maharashtra Political News : महायुतीमधील अंतर्गत वादाविषयी एकनाथ शिंदे नाराज असून त्यांनी याविषयी अमित शहा यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती केल्याची चर्चा आहे.
Eknath Shinde Meet Amit Shah
Eknath Shinde Meet Amit Shahsarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Delhi tour : एकाच महिन्यात तिसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. शिंदेंनी गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शिंदेंनी यांनी शहांसोबतच्या भेटीनंतर आपल्या खासदारांच्या समस्यांच्या संदर्भात भेट घेतली असल्याचे म्हटले. खासदारांच्या मतदारसंघात अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी ही भेट असल्याचे म्हटले होते. मात्र, शहांसोबत शिंदेंनी एकांतात 25 मिनिटे चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या विषयी एका मराठी वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

शिंदेंनी महायुतीमधील तक्रारींचा पाढाच शहा यांच्यासमोर वाचून आपले मन मोकळे केल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात आहे. शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांकडून वाॅच ठेवण्यात येत आहे. महत्त्वाच्या नियुक्त्या देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगी होत आहे. त्यामुळे फडणवीसांकडून शिंदेची कोंडी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे फडणवीसांच्या विषयी देखील त्यांनी शहांसोबत चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

सुत्रांनी दिलेल्य माहितीनुसार महायुतीमधील अंतर्गत वादाविषयी एकनाथ शिंदेंनी शहा यांना साकडे घातले. तसेच वादाविषयी शहा यांनी लक्ष घालावे. तसेच पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवावा, विकासकामांच्या निधीविषयी, आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्याविषयी मध्यस्थ करावी, अशी विनंती देखील शिंदेंनी शहांना केल्याची माहिती आहे. दरम्यानस, महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सहकार्य करण्याचे आश्वासन शहांनी दिली शिंदेंना दिले आहे.

Eknath Shinde Meet Amit Shah
MNS Politics : राज ठाकरेंच्या शिलेदाराचा दणका, 'त्या' पूलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार; सरकारनेही घेतली दखल

पंतप्रधान मोदींची भेट

शिंदे यांनी सहपरिवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याविषयी शिंदेंनी ट्विट करत सांगितले आहे की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे आलो असता आज ही भेट संपन्न झाली. यावेळी मोदीजींना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले, तसेच मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यदलांनी 'ऑपरेशन महादेव' यशस्वी करून पहलगाम हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याबद्दल त्यांना भगवान शिवशंकराची प्रतिमा भेट दिली.यावेळी केंद्र आणि राज्य शासनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. तसेच #शिवसेना - भाजप युती ही एनडीए अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनची असून आता या युतीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Eknath Shinde Meet Amit Shah
Local Body Elections : "आयोग म्हणतोय 'VVPAT'मुळे मतदान प्रक्रियेस वेळ लागतोय अन् भाजपकडून वेळ लागू नये म्हणून EVM चा आग्रह, सगळंच संशयास्पद..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com