Uaday Samant : भास्कर जाधवांच्या मतदार संघात शिवसेनेचं ऑपरेशन टायगर? सामंतांची राजकीय खेळी

Uaday Samant On Bhaskar Jadhav : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगुल वाजला आहे. तळ कोकणातही जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे. दरम्यान उदय सामंत यांनी पुन्हा एकदा पक्ष मजबुतीकडे लक्ष दिले आहे.
Bhaskar Jadhav Eknath Shinde Uday Samant And Ratnagiri zp ps reshuffle
Bhaskar Jadhav Eknath Shinde Uday Samant And Ratnagiri zp ps reshufflesarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमीचा सारांश :

  1. गुहागरमधील भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात पडवे गावातील मुस्लिम समाजाने शिवसेनेत प्रवेश केला आहे.

  2. उदय सामंत यांनी अधिवेशन संपताच पक्षबांधणीच्या अनुषंगाने पहिला मोठा स्ट्राईक याच मतदारसंघात केला.

  3. या प्रवेशामुळे जिल्ह्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर' सुरू झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

Ratnagiri News  : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगुल वाजला आहे. गावपातळीवर आता नेते मंडळी सक्रीय झाले असून राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जातेय. राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतही आता स्थानिकच्या पार्श्वभूमिवर सक्रीय झाले असून त्यांनी पक्षबांधणी आणि मजबुतीकरणाकडे लक्ष घातले आहे. दरम्यान त्यांनी अधिवेशन संपताच पहिला स्ट्राईल भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात करत मुस्लिम समाजालाच आपल्याकडे खेचले आहे. भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदार संघातील पडवे गावातील अल्पसंख्याक बांधवांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला आहे. यामुळे आता जिल्ह्यात पुन्हा ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. (Shiv Sena's Strategic Move: Uday Samant Initiates Ground-Level Mobilization Ahead of Local Elections)

यावेळी सामंत यांनी, राज्यातील अल्पसंख्याक बांधव असो किंवा माझ्या जिल्ह्यातील तो आमच्याबरोबर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तर पडवे गावातील अल्पसंख्याक बांधवांनी ते राज्याच्या निदर्शनास आणून दिलं आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून केंद्रात किंवा राज्यातील सरकार जातपात पाहून विकास करत नाही हे सिद्ध केलं आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे गुहागरातील शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेना आणि महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला आहे. ते रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात शिवसेनेच्या प्रवेश कार्यक्रमात बोलत होते.

Bhaskar Jadhav Eknath Shinde Uday Samant And Ratnagiri zp ps reshuffle
Kokan Politics : राज-उद्धव ठाकरेंचे युतीचे संकेत; कोकणात सर्वात जास्त फटका शिंदेंनाच बसणार!

यावेळी राजेश बेंडल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत भविष्यातील राजकीय वाटचालीचे संकेत दिले. या वेळी माजी आमदार सुभाष बने, बाबू म्हाप, तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, उपतालुकाप्रमुख संतोष साखरकर, तुकाराम निवाते, शिरीष चव्हाण, हुमणे गुरूजी, शहरप्रमुख नीलेश मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी सामंत म्हणाले, लाडकी बहीण योजनेमध्ये अल्पसंख्याक बहिणींचाही समावेश आहे. त्यांच्याबाबतीत कोणताही दुजाभाव केलेला नाही. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकविणार हे निश्चित आहे. त्यासाठी मित्रपक्षांमधील गैरसमज दूर व्हायला पाहिजेत आणि केवळ कोणालातरी विरोध म्हणून प्रवेश नसावा.

आमदार जाधवांवर स्तुतीसुमने

गुहागर मतदार संघातील काही लोक सध्या विरोधी वातावरण तयार करत आहेत. विकासकामात अडथळे आणत आहेत. मात्र येथील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विकासकामांना कधीच विरोध केलेला नाही. ते नेहमीच विकासाच्यामागे उभे राहिल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

Bhaskar Jadhav Eknath Shinde Uday Samant And Ratnagiri zp ps reshuffle
Kokan Politics : रामदास भाई, आरोप करून शांत झालात, पण तटकरे अजूनही पत्राची वाट पाहातायत...

पडणारे प्रश्न :

1. ऑपरेशन टायगर म्हणजे काय?
– शिवसेनेच्या अंतर्गत पक्षवाढीसाठी आणि विरोधकांच्या बालेकिल्ल्यावर घाव घालण्यासाठी राबवले जाणारे संघटनात्मक अभियान.

2. कोणत्या समाजाचा शिवसेनेत प्रवेश झाला?
– गुहागरमधील पडवे गावातील मुस्लिम समाजाने शिवसेनेत प्रवेश केला आहे.

3. याचा उद्देश काय आहे?
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळवणे आणि भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात प्रभाव वाढवणे.

4. उदय सामंत यांचा या घडामोडीमध्ये काय सहभाग आहे?
– त्यांनी पालकमंत्री आणि शिवसेना नेते म्हणून पक्षबांधणीच्या उद्देशाने हा प्रवेश घडवून आणला.

5. यामुळे काय परिणाम होऊ शकतो?
– गुहागर मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलू शकतात आणि निवडणुकीपूर्वी शिवसेनेला धार मिळू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com