EVM Controversy : ईव्हीएम 'ओक्के', नांदेडमध्ये 75 मतदान केंद्रावरील तपासणीत आकडे जुळले!

EVM-VVPAT votes matched in Nanded : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांची संख्या अचूक आल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीच ही माहिती दिली.
Nanded EVM News
Nanded EVM NewsSarkarnama
Published on
Updated on

नांदेड : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला 236 जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुतीने केलेल्या या कमबॅकमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. विशेषतः विरोधी पक्ष आणि महाविकास आघाडीने तर हा महायुतीचा नव्हे तर ईव्हीएमचा विजय असल्याचा आरोप करत 'कुछ तो गडबड है' म्हणत बॅलेटवर निवडणुका घेण्यासाठी चळवळ उभारण्याचा इशारा दिला.

तसेच महाविकास आघाडीच्या राज्यातील अनेक उमेदवारांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट च्या मतांची फेरमतमोजणीची मागणी करत निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केले होते. (EVM Machine) लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातील 30 आणि विधानसभेच्या 45 अशा एकूण 75 मतदान केंद्रांची तपासणी नुकतीच करण्यात आली.

Nanded EVM News
Sharad Pawar : EVM च्या विरोधात MVA सुप्रीम कोर्टात जाणार; शरद पवारांच्या नेतृत्वात लढा उभारणार

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांची संख्या अचूक आल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीच ही माहिती दिली. (Nanded) विधानसभा मतदारसंघनिहाय पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या प्रत्यक्ष मोजण्यात आल्या. त्यानंतर त्याची जुळवणी ईव्हीएममधील मतांसोबत करण्यात आली.

Nanded EVM News
Nanded Loksabha By-Election : बाहेरच्यांना नांदेड पोरका वाटतो, पण अजून मी जिवंत आहे : अशोक चव्हाण

यात कुठलाही फरक आढळून आला नाही, असे सांगण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदारसंघातील प्रत्येक पाच या प्रमाणे 45 मतदान केंद्रावर ही फेरतपासणी करण्यात आली. तर लोकसभेच्या नांदेड पोटनिवडणुकीसाठी सहा विधानसभा मतदारंसघातील प्रत्येकी पाच अशा तीस मतदान केंद्रावर फेरमतमोजणीची प्रक्रिया राबवण्यात आली होती.

Nanded EVM News
Supriya Sule : एकीकडे जानकरांनी 'EVM'चा मुद्दा तापवला,राजीनामाही द्यायची तयारी; तर सुप्रिया सुळे म्हणतात,'मी चारवेळा...

लाॅटरी पद्धतीने मतदान केंद्राची निवड करण्यात आली होती. लोकसभेसाठी भोकर, मुखेड, नांदेड उत्तर,नांदेड दक्षिण,उमरगा या केंद्रावर फेरतपासणी करण्यात आली. तर विधानसभेसाठी किनवट, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण मतदारंसघातील मतदान केंद्र निवडण्यात आली होती. निवडणुक निरिक्षक आणि वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी ही प्रक्रिया पार पडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com