Supriya Sule : एकीकडे जानकरांनी 'EVM'चा मुद्दा तापवला,राजीनामाही द्यायची तयारी; तर सुप्रिया सुळे म्हणतात,'मी चारवेळा...

NCP Sharadchandra Pawar Party On EVM : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएमबाबत आक्रमक भूमिका घेत राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहेत.
 Supriya Sule On EVM  .jpg
Supriya Sule On EVM .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. तसेच निवडणुका आता 'बॅलेट पेपर' वर घेण्यात यावेत, अशी जोरदार मागणी विरोधकांकडून होताना पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएमबाबत आक्रमक भूमिका घेत राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात शनिवारी (ता.7) मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारचा शपथविधी सोहळ्यासह ईव्हीएमवरही रोखठोक भाष्य केलं. सुळे म्हणाल्या, ईव्हीएमबाबत (EVM) आता पुढे काय भूमिका घ्यायची याबाबत इंडिया आघाडीची बैठक झाली आहे. ईव्हीएमबाबत पूर्वीपासूनच काँग्रेस काम करत आहे. त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीत ईव्हीएमविरोधात सुप्रीम कोर्टात जायचं का ? याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यावरही खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडली. म्हणाल्या, उत्तम जानकर यांनी जी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील लोकांमध्ये अस्वस्थता आहे. लोकप्रतिनिधी म्हणून ती अस्वस्थता जाणून घेण्याचं काम आमचं आहे.

 Supriya Sule On EVM  .jpg
Devendra Fadnavis : 'सीएम' पद अन् गृहखातं नाकारल्यानंतर शिंदेंसाठी फडणवीस मोठा त्याग करणार; 'हे' सर्वोच्च पद देणार?

समाजामध्ये ईव्हीएमबाबत अस्वस्थता आहे. मात्र मी चारवेळा त्याच EVM वरती निवडणूक लढवून जिंकून आलेली आहे. परंतु, निवडणूक आयोगाला एवढीच मागणी आहे की, समाजात एवढी अस्वस्थता असेल आणि जर 'ईव्हीएम'वरून 'बॅलेट पेपर'वर येण्याची मागणी होत आहे. तर ती पूर्ण करायला हवी.

कारण जगातील अनेक देश बॅलेटवर शिफ्ट झाले आहेत. मात्र, सरकार मारकडवाडीमधील लोकांवर गुन्हे दाखल करत आहेत, ही दडपशाही आहे,असा हल्लाबोलही सुप्रिया सुळे यांंनी यावेळी केला.

 Supriya Sule On EVM  .jpg
Sharad Pawar Markadwadi Tour : पवारांच्या दौऱ्यात होणार ‘लाँग मार्च’चे प्लॅनिंग; राहुल गांधींसह केजरीवाल, बॅनर्जी, अखिलेश, ठाकरेही येणार?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीचे अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, त्यांनी अशी भूमिका घेतली असेल, तर त्यांचं स्वागतच होईल. लोकशाही वाचवण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष असला पाहिजे असं मतही त्यांंनी व्यक्त केलं.तसेच दीदीसमोर येणार असतील, तर त्यांचं स्वागत आहे असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com