

Nanded : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार गप्प आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा लढा सुरू असला तरी राज्य सरकारच्या अखत्यारित आणि त्यांनी जाहीर केलेल्या गोष्टींची देखील पुर्तात केली जात नाहीये. (Ashok Chavan On Maratha Reservation) या विरोधात नांदेड येथे हदगाव तालुक्यातील दत्ता हडणसणकर याने उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देवून अन्याय दूर करा, या मागणीसाठी दोन आठवड्यापासून या तरुणाचे उपोषण सुरू असल्याने आज त्याची प्रकृती बिघडली.
याची माहिती मिळताच काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दत्ता हडसणकर याच्याशी संपर्क साधत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. (Maratha Reservation) मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपण पावसाळी अधिवेशनात सभागृहात अवाज उठवणारच आहोत, असा विश्वास त्यांनी उपोषणकर्त्या तरुणाला दिला. तसेच प्रकृती खालावल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.
या संदर्भात अशोक चव्हाण यांनी ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे. (Nanded) नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील दत्ता पाटील हडसणीकर सुमारे दोन आठवड्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करीत आहेत. दूरध्वनीवरून संपर्क साधून मी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.
आजपासून सुरू झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही लावून धरणारच आहोत. दरम्यान, प्रकृती खालावल्याने हडसणीकर यांना विष्णुपुरी, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्य सरकारने या उपोषणाची तातडीने दखल घेण्याची आवश्यकता असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.