NCP Politic's-video : मंत्रिमंडळातील एक जागा कोणासाठी रिक्त ठेवली?....राष्ट्रवादीच्या नेत्याने थेट नावच घेत डेडलाईनही सांगितली...

Mahayuti Cabinet : महायुतीने मंत्रिपदाची एक जागा रिक्त ठेवण्यात आली आहे, त्यावरून राज्यात सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत.
Amol Mitkari-Jayant Patil
Amol Mitkari-Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 16 December : महायुती सरकारचा (Mahayuti Government) पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी (ता. १५ डिसेंबर) पार पडला. एक जागा सोडता महायुतीने सर्व मंत्रिपदे भरली आहेत. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींना विचारले असता त्यांनी थेट जयंत पाटील यांचे नाव घेत मागील महायुती सरकारमध्येही जयंत पाटील यांच्यासाठी एक जागा रिक्त ठेवली होती, आताही त्यांच्यासाठी एक मंत्रिपद रिक्त ठेवले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत योग्य निर्णय होईल, असे भाकितही मिटकरी यांनी केले आहे.

महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी नागपुरात पार पाडला. महायुतीमधील तीन पक्षाच्या एकूण ३९ आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. मात्र, महायुतीने मंत्रिपदाची एक जागा रिक्त ठेवण्यात आली आहे, त्यावरून राज्यात सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत. त्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार मिटकरींना विचारले असता त्यांनी थेट जयंत पाटील (Jayant Patil) यांचे नाव घेतले.

मागील सरकारमध्येही एक मंत्रिपद जयंत पाटील यांच्यासाठी रिक्त ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांनी फार विचार केला. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि त्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला अधिकच्या जागा मिळाल्या. त्या वेळी त्यांना वाटलं की, आता आपल्याला महायुतीसोबत जाण्याची गरज नाही. पण आता तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एक मंत्रिपद जे रिक्त ठेवण्यात आले आहे, त्याकरिता योग्य व्यक्ती आणि योग्य वेळ.... आणि जयंत पाटील हे स्वतःच विधानसभेत बोलले आहेत. ते लवकरच योग्य निर्णय घेतील, असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले.

Amol Mitkari-Jayant Patil
Dhananjay Chandrachud : माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मोठा गुन्हा केलाय; शिवसेना खासदाराने का केला आरोप?

महायुती सरकारने जी जागा रिक्त ठेवली आहे, ती वन डाऊनला जो प्लेयर येतो ना, त्यासाठी ठेवण्यात आलेली आहे. जयंत पाटील यांना अस्वस्थ होणं साहजिक आहे. पण, माझ्या माहितीप्रमाणे ते नक्की येतील, कारण त्यांनी स्वतःच सांगितलं आहे की योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, त्यामुळे योग्य वेळ झालेली आहे, त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत योग्य निर्णय होणार, असेही भाकीत अमोल मिटकरी यांनी केले आहे.

Amol Mitkari-Jayant Patil
Tanaji Sawant : नाराज तानाजी सावंत नागपूरचे अधिवेशन सोडून तातडीने पुण्यात दाखल

आमदार मिटकरी म्हणाले, मंत्रिमंडळात एकच जागा रिक्त का ठेवली, हे मी आताच सांगितले तर त्याचे गांभीर्य राहणार नाही. त्या मुळे एक जागा रिक्त ठेवण्यामागचा उद्देश हा योग्य व्यक्ती, योग्य वेळ आणि योग्य निर्णय, असा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com