Arjun Khotkar-Pankaja Munde News : माझ्या राजकीय आयुष्यात गोपीनाथ मुंडेंचा मला मोठा आधार होता! पंकजा मुंडेंनी राखी बांधताच खोतकर भावूक झाले..

Arjun Khotkar gets emotional recalling Gopinath Munde’s strong support in his political journey : गोपीनाथ मुंडे हे अर्जुन खोतकर यांना आपले मानसपूत्र मानत होते. पंकजा मुंडे यांनी याचा उल्लेख करत या नात्याने मी खोतकरांची बहीणच.
Arjun Khotkar Celebrate Rakhi With Pankaja Munde News
Arjun Khotkar Celebrate Rakhi With Pankaja Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : शिवसेनेचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांना नुकतीच राज्याच्या पर्यावरण तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राखी बांधली. स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणासाठी जालन्यात आल्यानंतर पंकजा मुंडे अर्जुन खोकतकर यांच्या घरी गेल्या. मुंडे आणि खोतकर यांच्या कुटुंबामध्ये जिव्हाळ्याचे संबंध कायम आहेत. राखी बांधल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

' माझ्या राजकीय आयुष्यात गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) साहेबांचा मला मोठा आधार होता. आज ते हयात नाहीत, याचे दुःख मनात कायम' असल्याचे सांगताना खोतकर यांचे डोळे पाणावले होते. 1995 मध्ये राज्यात सर्वप्रथम शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले होते. ही सत्ता आणण्यामध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा सिंहाचा वाटा होता. याच युतीच्या पहिल्या मंत्रीमंडळात तरुण आमदार आणि मंत्री होण्याची संधी खोतकर यांना मिळाली होती.

गोपीनाथ मुंडे हे अर्जुन खोतकर यांना आपले मानसपूत्र मानत होते. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी याचा उल्लेख करत या नात्याने मी खोतकरांची बहीणच असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली. प्रीतम मुंडे आणि आपण खोतकर यांच्याकडे भाऊबीज, राखी पौर्णिमेला कायम येत असतो. केवळ राखीच्या धाग्यामुळेच नाही, तर आमचे कौटुंबिक संबंध घट्ट आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईमुळे मला राज्यात असंख्य भाऊ मिळाले आहेत.

Arjun Khotkar Celebrate Rakhi With Pankaja Munde News
Arjun Khotkar-Bhaskar Ambekar News : खासदार कल्याण काळे, अर्जुन खोतकर, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर एकत्र!

अर्जुन भाऊ यांना तर गोपीनाथ मुंडे आपले मानसपुत्र मानायचे. त्यामुळे माहेरी मोठ्या उत्साहात स्वागत झाले, मानपान दिला गेला. याने मी देखील भारावून गेले. नेहमी यायची संधी मिळो, अशी सदिच्छा व्यक्त करत पंकजा मुंडे यांनी अर्जुन खोतकर यांना राखी बांधली. भावानेही प्रेमाची ओवाळणी देत बहीणीच्या कायम पाठीशी उभा राहील अशी ग्वाही दिली. गोपीनाथ मुंडेसाहेबांचा आपल्याला कायम आधार वाटायचा.

Arjun Khotkar Celebrate Rakhi With Pankaja Munde News
Jalna Municipal Corporation : गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशामागे मोठ्ठा प्लॅन... खोतकरांंना महापालिकेत घाम फुटणार!

माझ्या राजकीय आयुष्यात त्यांनी मला नेहमी आधार दिला. आज ते नसल्याचे दुःख आहेच, बहीणीला काय भेट दिली? असे विचारले तेव्हा, ते मोजायचं असतं का? असे खोतकर म्हणाले. राज्यात शिवसेना-भाजप युती असल्यापासून खोतकर आणि मुंडे कुटुंबियांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध आहेत. गोपीनाथ मुंडे यांनी अर्जुन खोतकर यांना राजकारणात वेळोवेळी मदत केली. युती सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे यांनीच त्यांचा नावाचा आग्रह धरला होता, असे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com