Ambadas Danve Letter To Governor : कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात सरकार अपयशी, राज्यपाल महोदय लक्ष घाला..

Shivsena UBT : या आठवड्यात राज्याच्या विविध शहरांमध्ये ८ घटनाहून अधिक जातीय तणाव किंवा हिंसाचाराचे प्रकार घडले आहेत.
Ambadas Danve Letter To Governor News
Ambadas Danve Letter To Governor NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : संत परंपरा लाभलेल्या अठरा पगड जातीच्या महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून धर्मांध प्रवृत्तीच्या काही समाजकंटकांकडून खतपाणी घातले जात आहे. या माध्यमातून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. (Ambadas Danve Letter To Governor) यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याने या प्रकरणात लक्ष घालून या सर्व घटनांची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पत्राद्वारे केली.

Ambadas Danve Letter To Governor News
Mla Kailas Patil On DCM Tour : दौऱ्यापुर्वी ठाकरे गटाच्या आमदाराचे फडणवीसांना अकरा प्रश्न..

अठरा पगड जातीच्या महाराष्ट्रात संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकोबा यांच्यासह महात्मा चक्रधर, सकळ संताची परंपरा आहे. (Shivsena) हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आहे. (Maharashtra) अशा कितीतरी महान विभूतींनी घडविलेल्या महाराष्ट्र राज्यात सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने राहत आले आहेत.

परंतु राज्यात गेल्या काही महिन्यांपासून व गेल्या आठवड्याभरात सतत काही असामाजिक प्रवृत्तींकडून सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रचार करून दंगली घडविण्याचे प्रकार सुरू आहेत. (Marathwada) दररोज एका शहरात दंगल घडविण्याचा प्रयत्न होतो. यामुळे सतत वातावरण धगधगत ठेवून राज्यात अशांतता पसरविण्याचे काम काही लोकांकडून सुरू आहे.

राज्यातील दंगलसदृश्य परिस्थिती पाहता, राज्याचे राज्यपाल म्हणून आपण या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज असल्याचे दानवे यांनी पत्रात म्हटले आहे. राज्यात जातीय सलोखा पाळण्याचा राज्याचा इतिहास असला तरी गेल्या अडीच ते तीन महिन्यांत विशेषतः या आठवड्यात राज्याच्या विविध शहरांमध्ये ८ घटनाहून अधिक जातीय तणाव किंवा हिंसाचाराचे प्रकार घडले आहेत.

काही ठिकाणी अचानक औरंगजेबाचे फोटो ठेवून उदात्तीकरण केले गेले आणि त्यातूनही जातीय तणाव वाढीस लागला. राज्यात जातीय तणाव वाढत असून सतत राज्यात अशांतता पसरविण्याचे काम सुरू आहे. पोलीस यंत्रणा जरी त्यांचे काम करत असली तरी या सर्व घटना रोखण्यात कुठेतरी सरकारलाही अपयश येत असल्याचे दानवे म्हणाले. राज्याचे प्रथम नागरिक म्हणून आपण या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी राज्यपाल बैस यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com