Vaidyanath Sugar Factory : पंकजा मुंडेना जीएसटी विभागाचा मोठा दणका, वैद्यनाथ कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

Pankaja Munde News : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने बेकायदेशीररित्या १९ कोटींचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed Politics : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने मे महिन्यात छापेमारीची कारवाई केली होती. केंद्र सरकारचा जीएसटी कर थकवल्याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याची चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

मात्र, आत्तापर्यंत भाजपविरोधी नेत्यांवर, विरोधी पक्षातील नेत्यांवरच ईडी, सीबीआयचे छापे पडत असतानाच भाजपच्याच नेत्याच्या कारखान्यावर कारवाई केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण आता पुन्हा एकदा जीएसटी विभागाने पंकजा मुंडे यांना धक्का दिला आहे.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने नोटिसा बजावल्या होत्या. पण या नोटिशींना प्रत्युत्तर न दिल्याने एप्रिल महिन्यात छापेमारी करतानाच काही कागदपत्रे हस्तगत केली होती. त्यामध्ये आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde On GST Raid : अचानक जीएसटीची धाड पडल्याने पंकजा मुंडे आश्चर्यचकित..

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने बेकायदेशीररित्या १९ कोटींचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाले होते. शनिवारी कारखान्याला यासंदर्भात नोटीस बजावली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना यापूर्वीच युनियन बँकेने सील केला असून लिलावाची प्रक्रिया देखील सुरू केल्याची चर्चा सुरू आहे.

एकीकडे केंद्रीय सहकार विभागाने (GST)सहकारी साखर कारखान्यांना कोट्यावधी रुपयांचा आयकर माफ करुन मदत केली आहे. मात्र, याचवेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला जीएसटी विभागाने केलेली कारवाईवरुन राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहेत.

भगवान गडाच्या पायथ्याशी पार पडलेल्या सप्ताहाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे व त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी आपल्यातील राजकीय वर संपल्याचे घोषित केले होते. या कार्यक्रमात बोलताना भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी ‘पंकजाने अहंकार सोडावा’असे म्हटले होते. त्यावर पंकजांनी आपल्यात कसलाही अहंकार नाही, माझी उंची आणि आवाज मोठा आहे! असे प्रत्युत्तर त्यांना दिले होते. बहीण भावांनी आपसातील राजकीय वैर संपल्याची घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंकजा यांच्या कारखान्यावर धाड पडल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

मागील काही वर्षांपासून वैद्यनाथ साखर कारखाना विविध कारणांनी अडचणीत आला आहे. कामगार, मुकादमांची देणी थकली असून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न कायम समोर येतो. कारखान्यावर विविध बँकांचे कर्जही थकलेले आहे.

Pankaja Munde
Indrayani River Improvement Project : देहू-आळंदी, पिंपरी-चिंचवडचे रूप पालटणारा ५७७ कोटींचा प्रकल्प केंद्राला सादर

'' युनियन बँकेकडून खाते जुलै २०२१ मध्ये सील...''

पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे(Vaidyanath Sugar Factory) युनियन बँक खाते जुलै २०२१ मध्ये सील करण्यात आले होते. पीएफची रक्कम थकल्यामुळे ईपीएफओच्यावतीने वैद्यनाथ कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्षा आहेत. पीएफचे एक कोटी 46 लाख रुपये थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

ईपीएफओच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाने पांगरी (ता. पर‌ळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते जप्त केले. तब्बल 92 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी सुधीर वानखेडे यांनी ही कारवाई केल्याची माहिती होती.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 या काळातील कर्मचारी आणि कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची एकूण 1.46 कोटींची रक्कम थकीत होती. उर्वरित 56 लाख रुपयांच्या वसुलीसाठी कार्यवाही सुरु असल्याचे ईपीएफओ कार्यालयाने सांगितले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Pankaja Munde
Ravindra Chavan News : भाजप-शिंदे गटात वादाचा भडका उडाला असतानाच मंत्री रवींद्र चव्हाणांचं 'कल्याण'बाबत मोठं विधान, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com