Indrayani River Improvement Project : देहू-आळंदी, पिंपरी-चिंचवडचे रूप पालटणारा ५७७ कोटींचा प्रकल्प केंद्राला सादर

Pimpri-Chinchwad : या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ४० टक्के, तर केंद्राकडून ६० टक्के निधी मिळणार आहे.
Alandi-Dehu
Alandi-DehuSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पिंपरी चिंचवड, देहू, आळंदीसह सुमारे ४६ गावांचा कायापालट करणारा सुमारे ५७७.१६ कोटी रुपयांचा महत्वकांक्षी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने नुकताच स्वीकारला आहे. अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारने तो केंद्र सरकारकडे पाठविला आहे. इंद्रायणी नदीची स्वच्छता, सांडपाणी, जलशुद्धीकरण आणि जलवाहतुकीच्या दृष्टीनेसुद्धा हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. (577 crore proposal from PMRDA for Alandi-Dehu, Pimpri Chinchwad submitted to Centre)

पिंपरी चिंचवड महापालिका, महापालिकेलगतची ४६ गावे आणि सुमारे १५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या तीन ग्रामपंचायतींना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. ही माहिती ‘पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता अशोक भालेकर यांच्या हवाल्याने जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप यांनी दिली आहे.

Alandi-Dehu
Ramesh Kadam in Mohol : रमेश कदमांची मोहोळमध्ये क्रेझ कायम; मतदारसंघात ८ वर्षांनंतर आलेल्या माजी आमदारांचे जंगी स्वागत

काही दिवसांपूर्वी ‘पीएमआरडीए’ने इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राज्य सरकारकडे सादर केला आहे. या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पात आळंदी, देहू ही दोन्ही तीर्थस्थळे, पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्र, पंधरा हजारांची तीन आणि त्यापेक्षा छोटी अशी ४६ गावे येतात. इंद्रायणी नदीलगत ही सर्व परिसर आहे.

मैलापाणी, औद्योगिक सांडपाणी, घरगुती पाणी इंद्रायणीत सोडल्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. इंद्रायणी नदीची स्वच्छता आणि शुद्धीकरणाच्या उपाय योजना, रिव्हरफ्रंट्‌स तयार करणे आदी या प्रकल्पात प्रस्तावित आहे. जलवाहतुकीच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करून जलवाहतूकाचाही यात समावेश आहे.

Alandi-Dehu
Solapur Congress : पक्षविरोधात पोस्ट करणे भोवले; काँग्रेसच्या सोलापूर शहर सचिवांची पक्षातून हकालपट्टी

इंद्रायणी नदीच्या दोन्ही काठावरील एकूण ५४ गावे आणि शहरातून सोडण्यात येणारे सांडपाणी प्रक्रिया करून नदीचे प्रदूषण नियंत्रित करण्याचा पर्याय हा प्रकल्प बनविताना विचारात घेण्यात आलेला आहे. या प्रकल्पात आळंदी, तळेगाव दाभाडे आणि लोणावळा या नगरपरिषदा, देहू आणि वडगाव मावळ दोन नगरपंचायती तसेच, देहू कॉन्टोन्मेंट बोर्ड, तीन ग्रामपंचायती ज्यांची लोकसंख्या १५ हजारापेक्षा जास्त आहे आणि इतर ४६ ग्रामपंचायतींचे कार्यक्षेत्र आहे.

Alandi-Dehu
Hiwarkhed Municipal Council : मिटकरी अन्‌ नागरिकांच्या पाठपुराव्याला यश; हिवरखेडला नगरपरिषद होण्याचा मार्ग मोकळा

इंद्रायणी नदी सुधारणेचा हा प्रकल्प राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाकडे सादर करण्यात आलेले आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ४० टक्के, तर केंद्राकडून ६० टक्के निधी मिळणार आहे. केंद्र सरकारकडून या प्रकल्पाला लवकरची मंजुरी मिळेल, असेही भालकर आणि जगताप यांच्याकडून सांगण्यात आले.

Alandi-Dehu
Maharashtra politics : …अब बारी आयी है! राहुल नार्वेकर रिमोट दाबणार; १६ आमदारांवर कंट्रोल येणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com