Harshvardhan Jadhav News : छत्तीसावा क्रमांक, तरी हर्षवर्धन जाधव यांना विजयाचा 'Confidence'

Loksabha Election 2024 : 2024 मध्ये याची पुनरावृत्ती होती की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतांना पुन्हा अपक्ष म्हणून मैदानात असलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी विजयाचा दावा केला आहे.
Harshvardhan Jadhav News
Harshvardhan Jadhav NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हे प्रचारात फारसे कुठेही दिसत नसले तरी विजयाबद्दल मात्र त्यांना फुल्ल काॅन्फिडन्स असल्याचे दिसून येत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टरच्या जोरावर त्यांनी ट्रॅक्टर या चिन्हावर तब्बल 2 लाख 83 हजार मते मिळवत निकाल बदलून टाकला होता. त्यांच्यामुळे झालेल्या मतविभाजनाचा फटका शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना बसला आणि अनपेक्षितपणे एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता.

2024 मध्ये याची पुनरावृत्ती होती की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतांना पुन्हा अपक्ष म्हणून मैदानात असलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी विजयाचा दावा केला आहे. सोशल मीडियावर मतदारांना आवाहन करणारा एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी महायुतीचे संदीपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील हे तिघेही कसे निवडून येऊ शकत नाही, याचे गणित मांडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Harshvardhan Jadhav News
Prithviraj Chavan News : भाजपला बहुमत मिळणे अशक्यच; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली 'ही' कारणं...

वंचितचा स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांची दोन लाख मते कमी झाल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. त्यांच्या मुस्लिम मतांमध्येही अफसर खान यांच्यामुळे फूट पडली असल्याने त्यांचा खेळ संपला आहे. हीच परिस्थिती महाविकास आघाडीच्या खैरेंची आहे, त्यांच्यासोबत यावेळी भाजप (BJP) नाही, त्यामुळे ते ही निवडून येऊ शकत नाही.

तर संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांचा पैठण मतदारसंघच या लोकसभा मतदारसंघात येत नसल्याने लोक त्यांना मतदान करणार नाही. अशावेळी शंभर टक्के आपल्याला संधी आहे. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मतदारांनी माझ्या पाठीशी उभे राहावे. छत्तीसाव्या क्रमाकांवर टीव्ही या माझ्या निवडणुक चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.

गेल्या निवडणुकीत गेमचेंजर ठरलेले हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यावेळी काहीसे दुर्लक्षित झाल्याचे चित्र आहे. काही दिवसांपासून ते सक्रीय झाले आहेत, पण खरी स्पर्धा ही महायुती-महाविकास आघाडी आणि एमआयएम (MIM) यांच्यातच आहे. त्यामुळे गेल्यावेळी पावणे तीन लाखांहून अधिक मते मिळवणारे हर्षवर्धन जाधव यावेळी कुठपर्यंत मजल मारतात, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Harshvardhan Jadhav News
Navneet Rana Vs Asaduddin Owaisi: 15 मिनिटं, 15 सेकंद पोलिसांना बाजूला सारा म्हणणाऱ्यांचा बंदोबस्त समाज कधी करणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com