Chhatrapati Sambhajinagar News : वंचित बहुनज आघाडीच्या साथीने गेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचा पतंग चांगलाच उडाला. महाराष्ट्रातील एकमेव खासदार छत्रपती संभाजीनगर मतदारंघातून निवडून आला. पण वंचितने या निवडणुकीत वेगळी भूमिका घेत स्वबळाचा नारा देत मुस्लिम उमेदवारही दिला. एकीकडे वंचितने इम्तियाज जलील यांच्या हक्काच्या मुस्लिम मतांमध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने अफसर खान यांना उमेदवारी दिली.
तर दुसरीकडे, महाविकास आघाडीमुळे शिवसेना ठाकरे गटाकडे मुस्लिम मतांचा ओढा वाढल्याचे चित्र आहे.वंचित सोबत नसल्याने आधीच गेल्यावेळी मिळालेली दलित समाजाची एकगठ्ठा मते दुरावण्याची शक्यता आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांप्रती दाखवलेले प्रेम यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी ओवेसी यांनी संभाजीनगरात तळ ठोकला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शहरातील मुस्लिम (Muslim) बहुल भागात फिरून ओवेसी यांनी आपली वोट बँक फुटू नये याची खबरदारी घ्यायला सुरवात केली आहे.दुसरीकडे जाहीर सभांमधून ते महाविकास आघाडीने कसे लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांना डावलले. 48 पैकी एकाही मतदारसंघात मुस्लिम उमेदवार दिला नाही, हा मुद्दा प्रकर्षाणे मांडत आहेत. रमझान ईदच्या दिवशी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मुस्लिम समाजाच्या लोकांच्या भेटी घेत पहिल्यांदाच त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावरही ओवेसींनी कडाडून हल्ला चढवत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला लक्ष्य केल्याचे दिसून आले. दोन शिवसेना, काका-पुतण्यांच्या दोन राष्ट्रवादी यापैकी एकाही पक्षाने एकानेही मुस्लीम उमेदवार दिला नाही. पण त्यांना मुस्लिमांची मते हवी आहेत. तुम्ही एकजूट दाखवली म्हणून आता ते ईदगाह मैदानापर्यंत आले आहेत, तुमच्या ताकदीने त्यांना तसे करण्यास भाग पाडले आहे, असा दावा ओवेसी यांनी केला आहे.
मुस्लिम मतांवर डोळा असणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाबरी मशिद पाडली हा गुन्हा होता हे मान्य करावे, असे आवहन ओवेसी यांनी केले.नव्याने धर्मनिरपेक्ष झालेल्या उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम मते मागण्यापूर्वी बाबरी मशिद पाडली यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. चंद्रकांत खैरे यांनीही बाबरी पाडणे हा गुन्हा होता हे मान्य करावे, असे म्हणत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
खान पाहिजे की बाण ? हा प्रचाराचा मुद्दा घेऊन वीस वर्ष खासदार झालेले खैरे आपण हिंदुत्ववादी असल्याचे सांगत होते. ते आता ईदगाह मैदानावर शुभेच्छा द्यायला आले आहेत. नमाज अदा करणाऱ्या व्यक्ती सुहृदयी असतात, असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यामध्ये पाच वर्षांत झालेला हा बदल पुढे किती जाईल, असा सवाल करत ओवेसी यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.इम्तियाज जलील यांना निवडून आणण्यासाठी एमआयएमला मुस्लिम वोट बँक राखत इतर मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. यासाठी ओवेसीसह इम्तियाज यांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे चित्र सध्या संभाजीनगरात आहे.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.