Harshvardhan Jadhav On Manoj Jarange : 'आमदारकीचा राजीनामा दिला मग पाठिंबा का नाही?', हर्षवर्धन जाधवांचा मनोज जरांगेंना सवाल

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha : सोशल मीडिया पेजवरून एक व्हिडिओ प्रसारित करत मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेविषयी काही शंका
Harshvardhan Jadhav Manoj Jarange Patil
Harshvardhan Jadhav Manoj Jarange Patil sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabah Election : लोकसभेसाठीचे मतदान झाले आहे. आता रिझल्ट काय लागणार याची वाट तुमच्यासारखी मी ही पाहतोय. पण मला एक कोड पडलयं मराठा आरक्षणासाठी ज्यांनी मदत केली नाही, त्यांना पाडा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले होते. पण मराठा आरक्षणासाठी मी आमदारकीचा MLA राजीनामा दिलेला असतांना मला पाठिंबा देण्यासंदर्भात जरांगे पाटील यांनी ब्र शब्दही का काढला नाही? असा सवाल छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी उपस्थित केला.

Harshvardhan Jadhav Manoj Jarange Patil
Mangesh Sable : ''मराठा समाज माजलाय, असं जर कोणी म्हणत असेल तर...'' डोंबिवलीत सत्कारानंतर मंगेश साबळेंचं विधान!

13 मे रोजी मतदान पार पडल्यानंतर हर्षवर्धन जाधव Harshvardhan Jadhav सध्या सहलीवर गेल्याचे बोलले जाते. आज त्यांनी आपल्या सोशल मीडिया पेजवरून एक व्हिडिओ प्रसारित करत मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेविषयी काही शंका उपस्थितीत केल्या. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर विरोध केला त्यांना पाडा, असे आवाहन जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी केले होते.

पण माझ्या सारख्या व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा दिला. त्याला मदत करा किंवा त्याला पाठिंबा द्या, याबद्दल जरांगे यांनी एकही शब्द काढला नाही? का काढला नसेल? याचं कोडं मला पडलं आहे. अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांनी जेव्हा बैठका आणि उपोषण सुरू केले होते. तेव्हा मी स्वतः त्यांना जाऊन भेटलो होतो. शेवटच्या बैठकीत मीच एकमेव राजकीय व्यक्ती होतो.

मराठा आरक्षणासंदर्भात माझी भूमिका मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना असं पाडा की ते पाच जन्म उभे राहता कामा नये, असं म्हणणाऱ्या जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांना मदत करा, असे का म्हणाले नसतील? असा माझा जरांगे जरांगे करणाऱ्यांना प्रश्न आहे.

जर मराठा आरक्षणासाठी आहुती देणाऱ्यांवरच आहुती होण्याची वेळ येणार असेल तर मला नाही वाटत भविष्यात कोणी आमदार, खासदार समाजासाठी राजीनामा देईल, अशा शब्दात हर्षवर्धन जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. मला हे कोड सुटलेलं नाही आणि सुटणारही नाही. आता रिझल्टची वाट पाहूया जे व्हायचयं ते होणारच आहे, असे उद्विग्न उद्गारही जाधव यांनी काढले.

(Edited By Roshan More)

Harshvardhan Jadhav Manoj Jarange Patil
Karnataka Legislative Council Election : लोकसभेच्या रणधुमाळीतच कर्नाटकात वाजले विधानपरिषदेचे बिगुल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com