Sharad Pawar News: शरद पवार मोठा डाव टाकणार, राज्यात 2 डिसेंबरनंतर राजकीय उलथापालथ? एकाचवेळी महायुती अन् आघाडीही हादरणार

Maharashtra Politics: एकीकडे काँग्रेसच्या विरोध झुगारत पवारांनी मनसेला महाविकास आघाडीसोबत घ्यावं यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याचदरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीनं थेट महायुतीतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशीच युती करण्याची तयारी दर्शवली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरी विसरुन महाविकास आघाडीतील काँग्रेस,उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यातही उद्धव ठाकरेंनी मविआला मनसेचं इंजिन जोडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पण काँग्रेसच्या तीव्र विरोधामुळे मनसेची आघाडीतील एन्ट्री अजूनही वेटिंगवरच राहिली आहे. अशातच आता शरद पवारांची (Sharad Pawar) राष्ट्रवादी लवकरच मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असून एकाचवेळी महायुती अन् महाविकास आघाडीसाठी तो धक्का ठरण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात अॅक्टिव्ह झाल्याचं दिसून येत आहे. त्यांनी स्थानिकच्या निवडणुकीसाठी राज्यभरात दौरे वाढवले असतानाच दुसरीकडे बैठका,मेळावे,भेटीगाठी याद्वारे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बूस्टर डोस देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. एकीकडे काँग्रेसच्या विरोध झुगारत पवारांनी मनसेला महाविकास आघाडीसोबत घ्यावं यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याचदरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीनं थेट महायुतीतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशीच युती करण्याची तयारी दर्शवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी कुर्डुवाडीनंतर आता सातारा जिल्ह्यात मोठा धमाका करण्याची तयारी सुरू केली आहे. शशिकांत शिंदे यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्याच भाजप सोडून कुणाशीही आघाडी करा या वक्तव्याचा दाखला देत थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाच युतीसाठी ऑफर दिली आहे.

शशिकांत शिंदे म्हणाले, शरद पवारांनी सांगितल्यानुसार आमच्या राष्ट्रवादीची कुर्डूवाडीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत (Eknath Shinde Shivsena) युती झाली आहे. ज्यावेळेस फार अति होतं, तेव्हा बंड होतं. हा नियतीचा नियम आहे. त्यांनी मनात आणलं तर ही नवी नांदी होऊ शकतं. दुसऱ्या सातारकरांनी ठरवायचं आता काय करायचं ते, आम्ही तर कुर्डुवाडीत निर्णय घेतला आहे, असा नवा बॉम्ब शशिकांत शिंदे यांनी थेट महायुतीतच टाकला आहे.

Sharad Pawar
Ajit Pawar: बाळराजेंचं अनगरमध्ये 'बिनविरोध'चा गुलाल उधळताच चॅलेंज; अजितदादांचा पाटलांवर पहिलाच थेट वार; म्हणाले, 'मस्ती असलेल्या लोकांना...'

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेल्या ऑफरनंतर आता साताऱ्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना मोठा निर्णय घेणार का याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदेंचा पहिल्यापासून बालेकिल्ला असलेल्या ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत भाजपनं फोडाफोडीचं राजकारण केल्यानंतर शिवसेना चांगलीच संतापल्याचं पाहायला मिळालं होतं.

भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणानंतर शिवसेनेच्या मंत्र्‍यांनी थेट महायुती सरकारच्या कॅबिनेट बैठकीवरच बहिष्कार टाकला होता. एवढ्यावरच हे प्रकरण न थांबता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची व नंतर तडकाफडकी दिल्ली गाठत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत हे प्रकरण तापवल्याची चर्चा होती. दिवसेंदिवस महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी वाढतच चालल्याचं दिसून येत आहे.

Sharad Pawar
NCP factions alliance : दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीचे वारे वाहत असतानाच अजितदादांविरोधात जुना शिलेदार मैदानात : राजकारणातून थांबण्याचा इशारा

महायुती म्हणून राज्यात सत्तेच्या गादीवर एकत्र बसलेल्या भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जोरदार कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याचं दिसून येत आहे.यातही अनेक ठिकाणी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमने-सामने आल्याचं दिसून येत आहे.'स्थानिक'च्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील संघर्ष आणखीच टोकदार झाला आहे.

कोकणातील मालवण पालिका निवडणुकीत हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी मालवणमधील भाजप नेते विजय केनवडेकर यांच्या घरी जाऊन स्टिंग ऑपरेशन केले. यावेळी तालुका अध्यक्ष बंड्या सावंत आणि काही पदाधिकारीही तेथे उपस्थित होते. तसेच पैशांनी भरलेली एक बॅग आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.

Sharad Pawar
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या 2 घटना; दोन्ही ठिकाणी महायुतीचीच पोलखोल...

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांच्या या स्टिंग ऑपरेशनवर मोठं विधान करतानाच 2 डिसेंबरपर्यंत मला ही युती टिकवायची आहे, त्यामुळे मी आता काही बोलणार नाही. पण मी नंतर उत्तर देईन असं म्हणत महायुतीतील राजकीय भूकंपाचेच संकेत दिले आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि निलेश राणे यांचे भाऊ, मंत्री नितेश राणे यांनीही बोचरी टीका केली आहे.

याचदरम्यान,आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आता थेट महायुतीतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षालाच युतीची ऑफर दिली आहे. आता या ऑफरनंतर शिंदेंची शिवसेना काय निर्णय घेते याकडे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे राज्यात 2 डिसेंबरनंतर मोठा राजकीय भूकंप होणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com