High Court : पाथरी बाजार समिती संचालकाच्या अपात्रतेला अंतरिम स्थगिती! पुढील सुनावणी 'या' तारखेला होणार

Pathri APMC director disqualification case News : ग्रामपंचायतीत ग्राम रोजगार सेवक म्हणून कार्यरत असताना संतोष गलबे यांनी बाजार समितीच्या व्यवस्थापन समितीचे संचालकपद स्वीकारल्याने ते अपात्र ठरत असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता.
Aurangabad High Court
Aurangabad High Courtsarkarnama
Published on
Updated on

Pathari Market Committee : परभणी जिल्ह्यातील पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष जगन्नाथ गलबे यांना अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. मंजुषा देशपांडे यांनी अंतरिम स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 सप्टेंबर रोजी होणार आहे.

ग्रामपंचायतीत ग्राम रोजगार सेवक म्हणून कार्यरत असताना संतोष गलबे यांनी बाजार समितीच्या व्यवस्थापन समितीचे संचालकपद स्वीकारल्याने ते अपात्र ठरत असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, परभणी तसेच विभागीय सहनिबंधक यांनी गलबे यांच्याविरुद्ध अपात्रतेची कारवाई केली होती.

त्याला गलबे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, याच मुद्द्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यानुसार त्यांच्यावर करण्यात आलेली अपात्रतेची कारवाई उच्च न्यायालयाने ३० मार्च २०२६ रोजी रद्द केली होती. ग्राम रोजगार सेवक हा पगारदार कर्मचारी नसून त्याला मानधन मिळते, त्यामुळे हे पद ‘लाभाचे पद’ ठरत नाही, असा न्यायालयाचा निष्कर्ष होता.

Aurangabad High Court
Pune APMC News : शरद पवारांच्या पत्रानंतर बाजार समितीच्या कारभाराच्या चौकशीचा फार्स; अर्धवट अहवालानंतर फेरचौकशीचे आदेश

याच निर्णयाचा आधार घेत गलबे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अपात्रतेच्या निर्णयाला आव्हान दिले. मात्र, जिल्हा उपनिबंधकांनी स्वतःच्या आदेशाचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत अपात्रतेचा मूळ आदेश कायम ठेवला.

Aurangabad High Court
Nashik APMC : नाशिकची बाजार समिती बरखास्त; CM फडणवीसांचा महायुतीच्या चुंभळे गटाला मोठा धक्का!

या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. सपकाळ, अ‍ॅड. ए. डी. खेडकर व अ‍ॅड. बी. आर. सालगुडे यांनी काम पाहिले, तर प्रतिवादीतर्फे अ‍ॅड. महेश एस. देशमुख, अ‍ॅड. मनीष पी. त्रिपाठी आणि राज्य सरकारतर्फे डॉ. कल्पलता पाटील भारस्वाडकर यांनी काम पाहिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com