Hingoli Loksabha Constituency : महायुती- महाविकास आघाडीतील लोकसभा इच्छूकांचा जीव टांगणीला..

Mahayuti News : जागा वाटपाचा फार्म्युला अद्याप ठरला नसला तरी सगळ्याच पक्षांचे नेते जागांवर दावे-प्रतिदावे करत आहेत.
Hingoli Loksabha Constituency
Hingoli Loksabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सध्या सुरू आहे. जागा वाटपाबाबत रोज नवनवीन दावे करण्यात येत आहेत. कोणाला किती व कोणत्या जागा मिळतील याबाबत तर्क लढवले जात आहेत. (Hingoli Loksabha Constituency) हीच परिस्थिती महायुतीतील तीनही पक्षांचीही झाली आहे. या जागा वाटपाच्या घोळामुळे निवडणूकीची तयारी करणाऱ्या इच्छूक उमेदवारांची घालमेल मात्र वाढली आहे.

Hingoli Loksabha Constituency
Mahavikas Aghadi : सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांची दिल्लीत बैठक; जागा वाटपावर...

हिंगोली (Hingoli) लोकसभा मतदारसंघातील इच्छूकांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) घटक पक्षातील शिवसेना ठाकरे गटाने दावा या मतदारसंघावर दावा केला आहे. ही जागा निवडून आणण्याच्या निर्धार सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी केला असून विजयाचे पेढे खाण्याचीही तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे ही जागा काँग्रेसला सुटेल या आशेवर असलेल्या आणि तयारीला लागेल्या इच्छूकांपैकी डॉ. अंकुश देवसरकर यांचे टेन्शन वाढले आहे.

अशीच अवस्था भाजपचे इच्छूक रामदास पाटील सुमठाणकर यांचीही झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून या दोघांनीही निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. (Marathwada) या जागेवर महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. या मतदारसंघातुन मीच निवडणूक लढवणार, असे विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी सांगुन टाकले आहे. त्यामुळे ही जागा भाजपाला सुटण्याची शक्यता कमीच आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जागा वाटपाचा फार्म्युला अद्याप ठरला नसला तरी अधुनमधून सगळ्याच पक्षांचे नेते जागांवर दावे-प्रतिदावे करत आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघात हीच परिस्थिती आहे. ही जागा काँग्रेसला सोडण्यात यावी यासाठी ते सुरुवातीपासून आग्रही आहे. अशोक चव्हाण समर्थक डॉ. अंकुश देवसरकर या मतदारसंघातून इच्छूक आहेत. चव्हाण हेही त्यांच्याबद्दल अनुकूल असून उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते.

महाविकास आघाडीतील शिवसेनेने गेल्या निवडणूकीत ही जागा जिंकल्यामुळे त्यांचा दावा अधिक मजबूत आहे. ठाकरे गट या जागेवर तडजोड करणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे डॉ. अंकुश देवसरकर यांना माघार घ्यावी लागणार, असे दिसते. ज्या अशोक चव्हाण यांनी त्यांना कामाला लावले, आता त्यांच्यावरच देवरसकर यांची समजूत काढण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

Hingoli Loksabha Constituency
Hingoli Loksabha Constituency : भाजपच्या `मिशन`ची शिंदे गटाला धास्ती ?

दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर यांनी गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. त्यांच्यावर हिंगोली लोकसभा संघटक म्हणून जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटणार असून मीच निवडणूक लढवणार असे खासदार हेमंत पाटील यांनी आधीच जाहीर करून टाकले आहे. अशावेळी रामदास पाटील सुमठाणकर यांच्या निवडणूक तयारीवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.

Edited By : Jagdish Pansare

Hingoli Loksabha Constituency
Hingoli Loksabha Constituency : `मीच उमेदवार`, हेमंत पाटलांच्या दाव्यानंतर ठाकरे गटाकडून कोण ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com