Marathwada News : हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील हेच उमेदवार असणार आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांनी पक्षाच्या बैठकीत आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणाही करून टाकली. एवढेच नाही, तर आजच ते विजयीही झाले, असे म्हणत गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्याने ते निवडून येतील, असा दावाही केला.
हिंगोली लोकसभा (Hingoli Lok Sabha) मतदारसंघावर भाजप (BJP) दावा सांगणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू आहे. महायुतीत ही जागा शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटालाच मिळणार असेही सांगितले जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांच्या बैठकीत हिंगोलीची जागा शिवसेनेला आणि विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemat Patil) यांनाच देण्याचा शब्द त्यांनी दिला होता आणि तो ते पाळणारच, असा दावा स्वतः हेमंत पाटील यांनी केला होता.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ता. 10 रोजीच्या हिंगोली जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील, आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोष बांगर (Santosh bangar) यांच्या उपस्थितीत महत्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बांगर यांनी हेमंत पाटील यांची उमेदवारी परस्परच जाहीर करून टाकली. गुलाबाच्या पाकळ्यांची पाटील यांच्यावर उधळण करत बांगर यांनी त्यांना विजयीही घोषित केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार बांगर यांना नसतांना त्यांनी पक्षाच्या बैठकीत हेमंत पाटील हेच हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून फिक्स असल्याचे जाहीर करून टाकले. बांगर यांच्या या अतिघाईमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील जागावाटपा संदर्भात राज्य पातळीवर महायुतीच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे.
अद्याप कोणता पक्ष किती जागा लढवणार, कुठल्या मतदारसंघातून लढवणार हे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. अशावेळी बांगर यांनी खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. हिंगोलीतून खासदार होण्याचे स्वप्न रंगवणाऱ्या भाजपमधील इच्छूकांचे मात्र बांगर यांच्या दाव्याने स्वप्न भंग होणार आहे.
बांगर यांनी हेमंत पाटील हेच उमेदवार असणार हे जाहीरपणे बैठकीत सांगितल्याने शिवसेना शिंदे गटात मात्र उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार बांगर यांच्या अतिउत्साहाबद्दल काय प्रतिक्रिया व्यक्त करतात हे त्यांच्या जिल्हा दौऱ्याच्यावेळी दिसून येईल.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.