Video Pradnya Satav - MP Ashtikar News : आष्टीकर झाले खासदार, सातव दुसऱ्यांदा आमदार; तरी शीतयुद्ध काही थांबेना !

Congree Vs UBT Shivsena : प्रज्ञा सातव पुन्हा आमदार झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचे काम न केल्याच्या आरोपावरून सातव-आष्टीकर यांच्यात पुन्हा भडका उडाला आहे.
MP Nagesh Patil - Prdnya Satav
MP Nagesh Patil - Prdnya Satav Sarkarnama
Published on
Updated on

Hingoli News : विधान परिषदेवर दुसऱ्यांदा निवड झालेल्या आमदार प्रज्ञा सातव आणि लोकसभेच्या हिंगोली मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यातील शीतयुद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही.

विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर हिंगोलीत दाखल होताच आमदार प्रज्ञा सातव यांनी खासदार आष्टीकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के.सी.वेणूगोपाल यांच्याकडे केलेल्या तक्रारीवरून जोरदार टीका केली.

माझ्या विरोधात तक्रार करायचीच होती तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) किंवा राज्यातील नेतृत्वाकडे करायला पाहिजे होते. पण त्यांनी थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव वेणूगोपाल यांच्याकडे लेखी तक्रार केली. याचाच अर्थ आष्टीकरांचा कोणी तरी रिमोट म्हणून वापर करत आहे, असा आरोप प्रज्ञा सातव यांनी केला.

यावर मी तुमच्या पेक्षा ज्येष्ठ आणि अनुभवी आहे. माझा कोणी रिमोट म्हणून वापर करू शकत नाही हे हिंगोली जिल्ह्याला माहित आहे. तुम्ही महाविकास आघाडीचे काम केले नाही हे अख्ख्या जगाला माहित आहे, अशा शब्दात खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सातव यांच्यावर पलटवार केला.

MP Nagesh Patil - Prdnya Satav
Congress News : 'क्रॉस व्होटिंग' करणाऱ्या काँग्रेस आमदारांवर कारवाई होण्याआधीच नव्यांचा शोध सुरू

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असताना काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी वंचितच्या चव्हाण यांना मदत केल्याचा आरोप आष्टीकर यांनी निकाला नंतर केला होता. आष्टीकर हिंगोली मतदारसंघातून लाखाच्या वर मताधिक्याने निवडून आले आहेत.

तरी त्यांनी आमदार प्रज्ञा सातव यांची लेखी तक्रार काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव वेणूगोपाल यांच्याकडे केली होती. सातव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी या पत्रात केली होती. मात्र काँग्रेस पक्षाने आष्टीकर यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली. उलट विधान परिषदेसाठी दुसऱ्यांदा सातव यांना उमेदवारी देत त्यांना निवडून आणले.

सातव पुन्हा आमदार झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचे काम न केल्याच्या आरोपावरून सातव-आष्टीकर यांच्यात पुन्हा भडका उडाला आहे. महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीतील अनेक प्रचार सभांमध्ये मी स्वतः हजर होते. खासदार आष्टीकरांनी त्यांच्या जिल्हाप्रमुखाचे फेसबुक व सोशल मिडियावरील (Social Media) पोस्ट एकदा तपासाव्यात. त्यात प्रचारात मी सहभागी झालेली त्यांना दिसले.

MP Nagesh Patil - Prdnya Satav
Devendra Fadnavis And Ajit Pawar : मोठी बातमी! राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर ढगात भरकटलं अन्...

लोकसभेला महाविकास आघाडी म्हणून मी आष्टीकर यांचेच काम केले.पण त्यानंतर आणि एक लाखाहून अधिक मतांनी विजयी झाल्यावरही ते माझ्यावर आरोप का करत आहेत? हे कळत नाही. माझ्या विरोधात तक्रार करायचीच होती तर ती राज्यातील नेत्यांकडे करता आली असती.

आमचे राष्ट्रीय सचिव वेणुगोपालजी यांचा आणि आष्टीकरांचा संपर्क नाही,की ते त्यांना ओळखत नाही.तरी त्यांनी थेट दिल्लीला त्यांच्याकडे तक्रार केल्यामुळे जिल्ह्यातील कोणी तरी त्यांचा रिमोट म्हणून वापर केला असल्याचा पुनरुच्चार सातव यांनी केला.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com