Beed Politics : पक्षातून उमेदवारीसाठी स्पर्धक नसलेले युतीचे मुंडे, मुंदडा अन् पवार गटाचे क्षीरसागर विरोधकांशी दोन हात कसे करणार?

Beed Politics Dhananjay Munde, Namita Mundada, Sandeep Kshirsagar : राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री धनंजय मुंडे व भाजपच्या आमदार नमिता मुंदडा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर या तीन आमदारांना सद्याच्या घडीला तरी पक्षातून उमेदवारीसाठी तगडा स्पर्धक समोर आलेला नाही.
Dhananjay Munde, Namita Mundada, Sandeep Kshirsagar
Dhananjay Munde, Namita Mundada, Sandeep KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 06 Sep : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकलं आहे. इच्छुकांनी उमेदवारीसाठी लॉबींग सुरु केलं आहे. एकेकाळचे प्रमुख प्रतिस्पर्धी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (BJP-NCP) एकत्र झाल्याने जागा वाटपाचा पेच आणि लोकसभेच्या निकालामुळे राष्ट्रवादीकडेही इच्छुकांची संख्या वाढली आहे.

एकीकडे उमेदवारीची रस्सीखेच असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) व भाजपच्या आमदार नमिता मुंदडा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर या तीन आमदारांना सद्याच्या घडीला तरी पक्षातून उमेदवारीसाठी तगडा स्पर्धक समोर आलेला नाही.

मात्र, निवडणुकीत विरोधी उमेदवारांशी हे नेते कसे दोन हात करतात हे पहावं लागणार आहे. जिल्ह्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. परळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे, माजलगावमधून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रकाश सोळंके, केजमधून भाजपच्या (BJP) नमिता मुंदडा, आष्टीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहे आजबे, गेवराईतून भाजपचे अॅड. लक्ष्मण पवार तर बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर आमदार आहेत.

मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पाच जागा लढवून दोन जागा जिंकल्या होत्या. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा जागा लढवून चार जागा जिंकल्या होत्या. दरम्यान, मागच्या तीन वर्षांत राजकारणात झपाट्याने बदल झाला आहे. अगोदर शिवसेनेत (Shivsena) फुट पडली तर वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फुटून महायुतीत सामिल झाली. राष्ट्रवादी महायुतीत येण्याने जिल्ह्यातील राजकीय समि‍करणे झपाट्याने बदलली आहेत.

Dhananjay Munde, Namita Mundada, Sandeep Kshirsagar
BJP Politics : महाराष्ट्र जिंकायचाय..भाजपचं ठरलं! 'या' चार शिलेदारांवर जबाबदारी

महायुतीत कोणत्या पक्षाला कोणती जागा द्यायची याचाच पेच निर्माण झाला. सर्वात मोठा पेच परळीच्या जागेचाच होता. पालकमंत्रीपद भूषविणाऱ्या धनंजय मुंडेंना उमेदवारी द्यायची की भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंना द्यायची हा कळीचा मुद्दा होता. पण, भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी दिल्याने या जागेचा पेच निकाली निघाला.

आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे उमेदवार म्हणून जवळपास निश्‍चित आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या पक्षातून व महायुतीतील अन्य भाजप किंवा शिवसेनेने या जागेवर अद्याप दावा सांगीतलेला नाही आणि त्या पक्षाकडून उमेदवारीसाठी कोणी प्रयत्न करताना दिसत नाही. केजमध्ये देखील भाजपच्या नमिता मुंदडा यांना उमेदवारीसाठी कोणी तगडा स्पर्धक अद्याप समोर आलेला नाही.

Dhananjay Munde, Namita Mundada, Sandeep Kshirsagar
Supriya Sule News : सुप्रिया सुळेंचं मोठं विधान; म्हणाल्या, 'दादा नेहमीच शिंदे गटाच्या टार्गेटवर...'

सुरुवातीला पक्षाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी माध्यमांसमोर उमेदवारीची मागणी केली. नंतर मात्र त्या पक्षातील अन्य कोणाला उमेदवारीसाठी भेटलेल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेने किंवा या पक्षातील इच्छुकांनी अद्याप केजमधून उमेदवारीसाठी हात उंचावलेला नाही. तर बीडमध्ये देखील संदीप क्षीरसागर यांच्या शिवाय उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अद्याप कोणी उमेदवारीसाठी थेट पुढे आलेले नाही.

या ठिकाणी उमेदवारीसाठी सनदी लेखापाल बी. बी. जाधव यांचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे प्रयत्न सुरु असले तरी त्यांनी अद्याप पक्षप्रवेश केलेला नाही. तसे, पुर्वी ही जागा शिवसेनेची होती. उद्धव ठाकरेंची शिवसेना आता महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) असली तरी या पक्षातून देखील अद्याप उमेदवारीसाठी जोरखसपणे मागणी पुढे आलेली नाही.

दुसरीकडे मात्र उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु आहे. लोकसभेला चांगला निकाल लागल्याने महाविकास आघाडी व विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची रस्सीखेच सुरु आहे. इतर मतदारसंघांत महायुती जागा पदरात पाडून घेण्यासाठी तर आघाडीत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु आहे. माजलगावची जागा महायुतीत राष्ट्रवादीकडे जाऊ शकते. आमदार प्रकाश सोळंकेंनी माघार जाहीर करुन जयसिंह पंडित यांना वारस जाहीर केले असले तरी पालकमंत्री धनंजय मुंडे रमेश आडसकर यांना फॉर असल्याचे दिसते.

याच मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उमेदवारीसाठी माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, नारायण डक, गंगाभीषण थावरे तसेच डॉ. सुरेश साबळे व डॉ. अशोक थोरात हे दोन माजी जिल्हा शल्यचिकित्सक देखील इच्छुक आहेत. आष्टीत महायुतीत राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे आमदार असल्याने त्यांचा प्रयत्न सुरु असतानाच भाजपचे सुरेश धस, भिमराव धोंडे देखील जोरदार तयारी करत आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख चाचपणी करत आहेत.

महायुतीत शिवसेनेकडे असलेल्या बीडमधून जिल्हा प्रमुख अनिल जगताप प्रयत्नाशिल असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर रुमाल टाकला आहे. त्यामुळे पक्षातून डॉ. योगेश क्षीरसागर, बबन गवते, तय्यब शेख, फारुक पटेल देखील इच्छुक आहेत. आघाडीत परळीची जागा सोडावी यासाठी प्रयत्न करत काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख उमेदवारीसाठी प्रयत्नशिल आहेत. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही बबन गित्ते, माधव जाधव, राजाभाऊ फड, सुदामती गुट्टे, फुलचंद कराड अशी इच्छकांची मोठी यादी आहे.

गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवारांना पक्षातून स्पर्धक नसला तरी घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित देखील जोरदार तयारी करत आहेत. आघाडीत शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांच्यासाठी जागा सुटू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील किसान आघाडीच्या पुजा मोरे इच्छुक आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com