Manoj Jarange Andolan : ओरिजनल खानदानी मराठा आहे, ती औलाद माझी नाही; मनोज जरांगेंनी कुणाला सुनावले

Eknath Shinde In Jalna : आरक्षणाचा घास आमच्या तोंडाजवळ आलेला आहे. काहीतरी वायफळ बडबड करू नका. पाच पिढ्यांपासून मराठा समाजाचं वाटोळं झालं आहे.
Manoj Jarange-Eknath Shinde
Manoj Jarange-Eknath ShindeSarkarnama

Jalna News : माझ्या आंदोलनामागे कोण नेता होता, अशी चर्चा झाली. पण मी तसले धंदेच करत नाही. तो नेता कोण होता, त्याचे नाव सांगा ना मला. खानदानी घरात जन्माला आलो आहे मी. ओरिजनल खानदानी मराठा आहे, कुणाच्या सांगण्यावरून मी आंदोलन करत नाही. कारण ती औलाद माझी नाही. ते रक्त माझे नाही, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी आंदोलनाबाबत होत असलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले. (I am not agitating at anyone's behest: Manoj Jarange)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरबत पिऊन मनोज जरांगे यांनी गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेले मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन मागे घेतले. जरांगे यांचे उपोषण सोडण्यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, माजी आमदार अर्जुन खोतकर आदी उपस्थित होते.

Manoj Jarange-Eknath Shinde
CM Shinde On Reservation: कुणावरही अन्याय न करता मराठ्यांना आरक्षण देणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मनोज जरांगे यांच्या उपोपषणाच्या मागे एक बडा नेता असल्याचा आरोप गेल्या आठवड्यात करण्यात आला होता. त्या आरोपाला जरांगे यांनी उपस्थितांसमाेर सोडताना सडेतोड शब्दांत सुनावले.

Manoj Jarange-Eknath Shinde
Manoj Jarange Protest : मुख्यमंत्री शिंदे हेच 'मराठा आरक्षण' देऊ शकतात; उपोषण सोडत जरांगेंनी व्यक्त केला विश्वास !

मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजासाठी मी पारदर्शक आहे. माझं वाटोळं, राखरांगोळी झाली तरी चालेल, पण मी माझ्या मराठा समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही. तो कोण आहे. मराठा समाजाशी गद्दारी करणारा उघडा झाला तर राज्यात तुमचा एकही पदाधिकारी राहणार नाही, हे लक्षात ठेवा. मराठा समाजाच्या पोरांशी तुम्ही घात करू नका. आरक्षणाचा घास आमच्या तोंडाजवळ आलेला आहे. काहीतरी वायफळ बडबड करू नका. पाच पिढ्यांपासून मराठा समाजाचं वाटोळं झालं आहे. तुमच्या राजकारणापायी मराठा समाजाच्या पोरांचा घात करू नका. आम्ही तसल्या चिठ्ठ्याबिठ्ठ्या असले धंदे करत नाही. काही असेल ते पारदर्शकपणे काम करत आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com