CM Shinde On Reservation: कुणावरही अन्याय न करता मराठ्यांना आरक्षण देणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Manoj Jarange Patil Protest End: "आता आंदोलन करण्याची वेळ येणार नाही," असा शब्द मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना दिला.
CM Shinde On Maratha Aarakshan
CM Shinde On Maratha AarakshanSarkarnama
Published on
Updated on

Maratha Aarakshan Live Updates: "ज्याचा हेतू शुद्ध, प्रामाणिक असतो, त्याच्याच मागे जनता उभी राहते," असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंचे कौतुक केले. "कुणावरही अन्याय न करता मराठ्यांना आरक्षण देणार," अशी ग्वाही मुख्मंत्र्यांनी दिली.

एकनाथ शिंदे म्हणाले, "मी उपोषण सोडण्याची विनंती केली आणि ती मान्य केली, याबद्दल मी आपला आभारी आहे. मनोज जरांगे स्वत:साठी नाही तर समाजासाठी लढतोय. त्याने कधीही स्वत:च्या फायद्यासाठी कोणताच प्रश्न मांडला नाही. त्याला मी मनापासून शुभेच्छा देत त्याचे अभिनंदन करतो, आता आंदोलन करण्याची वेळ येणार नाही," असा शब्द मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना दिला.

CM Shinde On Maratha Aarakshan
Maratha Aarakshan Live : मनोज जरांगेंचे उपोषण मागे, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

"मराठा समाज अतिशय शिस्तप्रिय आहे. यापूर्वीही आरक्षणासाठी शांततेत मोर्चे निघाले आहेत. पण या उपोषणात लाठीचार्जमुळे गालबोट लागले. यात ज्यांचा दोष होता, त्यांना निलंबित केले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील जाहीर माफी मागितली आहे. या लाठीचार्जबाबत मलाही खंत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मी जरागेंना अनेक वर्षे ओळखतो. मराठा समाजासाठी आमरण उपोषण करणे सोपं नाही. गेलेले आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका आमचीही आहे. लाठीचार्ज केलेली घटना दुर्दैवी आहे. मराठा समाज संवेदनशील आहे, मागील मोर्चे शांततेत काढले, पण या उपोषणाला गालबोट लागले, याला जबाबदार असलेल्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे मुख्ममंत्र्यांनी सांगितले.

Edited By : Mangesh Mahale

CM Shinde On Maratha Aarakshan
Sarkarnama Podcast : लातूरकरांचा चिमटा, मातब्बराचा पराभव

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com