Chandrakant Khaire On Shirsat News : मी काय बोललो होतो, शिरसाट काय सांगतायेत ? खैरेंनी सुनावले..

Marathwada : शिरसाट यांनी माझे नाव घेवून केलेली टीका यातून त्यांची मानसिकता स्पष्ट होते.
Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire News
Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena : ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याबद्दल शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांचा हवाल देवून केलेली टीका त्यांच्या अंगलट आली आहे. (Chandrakant Khaire On Shirsat News) चतुर्वेदी यांच्याबद्दलचे वक्तव्य माझे नाही, तर खैरे तसं बोलले होते, तुम्ही माझ्या तोंडी का घालता ? असे शिरसाट म्हणाले. यावर आता ठाकरे गटाचे नेते आणि ज्यांचे नाव घेऊन शिरसाट यांनी हा वाद सुरू केला त्या खैरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire News
Division Of Nilanga Taluka: निलंगा तालुक्याचे विभाजन मान्य नाही, अभिमन्यू पवारांना गावबंदीचा इशारा..

`सरकारनामा`, शी बोलताना (Chandrakant Khaire) खैरे म्हणाले, ` शिरसाट हे घाणेरडे राजकारण करत आहेत, मी काय बोललो होतो आणि शिरसाट काय सागंत आहेत. राज्यसभेची उमेदवारी माझ्याऐवजी प्रियंका चतुर्वेदी यांना देण्यात आली, तेव्हा मी `आदित्य ठाकरे यांना माझे काम आवडले नसले, चतुर्वेदींचे आवडले असेल म्हणून त्यांना उमेदवारी दिली`, असे म्हटले होते. मी बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक असल्यामुळे पक्षाचा आदेश म्हणून तो निर्णय स्वीकारला होता.

जेव्हा आम्ही उद्धवसाहेबांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी प्रियंका चतुर्वेदी या काॅंग्रेस पक्षातून शिवसेनेत (Shivsena) आल्या आहेत. त्यांना उमेदवारी द्यावी लागेल, असे मला सांगितले तेव्हा मी उद्धवसाहेबांचा निर्णय शिरसावंद्य मानला. मात्र संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी माझे नाव घेवून केलेली टीका यातून त्यांची मानसिकता स्पष्ट होते.

उलट संजय शिरसाट कसे आहेत, हे माहित असल्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नका, असे मला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी अडीच हजार फोन आले होते. तेव्हा मी लोकांची समजूत काढली, उद्धवसाहेबांना मुख्यमंत्री करायचे असल्याने, शिरसाट यांना निवडून द्यावे लागेल, असे सांगितले. लोकांनी त्यांना मतदान करुन निवडून आणले. पण हेच शिरसाट गद्दार निघाले.

माझ्या नावाने खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली. हा अत्यंत घाणेरडा प्रकार आहे. मी त्यावेळी काय बोललो होतो, याच्या क्लिप, त्यावेळच्या बातम्या आजही उपलब्ध आहेत. त्यामुळे शिरसाट यांचा खोटारडेपणा उघडा पडला आहे. मी एकनिष्ठ असल्यामुळे मला बदनाम करण्याचा, खैरे फुटत नाही म्हणून त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. पण तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे खैरे यांनी सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com