

Aimim News : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी राजकीय पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी संक्रांतीच्या निमित्ताने पहिल्यांदाच पतंग उडवत शिवसेना-भाजपच्या नेत्यांना डिवचले.
आज संक्रांत असल्यामुळे आकाशात दरवर्षीप्रमाणे पंतगांची पेच दिसून आली. पण यंदा दरवर्षी होणारी राजकीय पंतगबाजी मात्र झालीच नाही. महापालिकेसाठीचे मतदान आणि मकर संक्रांतीचा सण यामध्ये अवघ्या काही तासांचे अंतर असल्यामुळे एमआयएमची निवडणूक निशाणी असलेल्या पंतगांवर बंदी घालावी, अशी मागणी शिवसेनेचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली होती.
यावरून एमआयएमने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. तसेच संक्रांतीच्या दिवशी जोरात पतंग उडवा, असे आव्हान देत टोला लगावला होता. महापालिका निवडणुकीत फुकटात एमआयएमचा प्रचार नको, याची खबरदारी शिवसेना-भाजप व इतर राजकीय पक्षांनी घेतल्याचे आज दिसून आले. मकर संक्रांतीच्या दिनी संभाजीनगरमध्ये शिवसेना-भाजपच्या स्थानिक नेते, मंत्री, आमदार, खासदारांकडून पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते.
यात कोण कोणाचा राजकीय पतंग कापणार? याची खमंग चर्चाही होत असते. परंतू महापालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असताना एमआयएमची निवडणूक निशाणी असलेल्या पतंगचा मोह राजकीय नेत्यांनी टाळल्याचे दिसले.
शहरात कुठेही राजकीय पतंगबाजी दिसून आली नाही. इम्तियाज जलील यांनी मात्र आपल्या घरासमोर समर्थकांसह पतंगबाजी करत शिवसेना-भाजपसह इतर राजकीय पक्षांना डिवचण्याचा प्रयत्न केलाच.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.